सिन्नर : विश्व व जीवनसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तीमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचित असतात अशा वैज्ञानिकांची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोले लिखित ‘किमयागार’ हे पुस्तक असल्याचे प्रतिपादन बहि:शालचे वक्ते प्रा. विजयकुमार कर्नाटकी यांनी केले.तालुक्यातील दोडी येथील श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ अभियान अंतर्गत आयोजित व्याख्यानमालेत विषयावर गुंफताना ते बोलत होते.अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं याचा वस्तुपाठ किमयागार या पुस्तकात आहे, असे मत पद्मभूषण वसंत गोवारीकर यांनी मांडलेआहे. प्रास्ताविक केंद्रकार्यवाहक प्रा. के.डी. कुलकर्णी यांनी केले. आर.डी. आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. तर के. आर. कटारे यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य टी. पी. सहाणे, उपप्राचार्य ए. जी. गिते, एस. जी. शिंदे आदी उपस्थित होते.पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्यशास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीने लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल, असे कर्नाटकीे म्हणाले.
किमयागारमधून वैज्ञानिकांचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 11:53 PM
विश्व व जीवनसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दीप्तीमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचित असतात अशा वैज्ञानिकांची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोले लिखित ‘किमयागार’ हे पुस्तक असल्याचे प्रतिपादन बहि:शालचे वक्ते प्रा. विजयकुमार कर्नाटकी यांनी केले. तालुक्यातील दोडी येथील श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ अभियान अंतर्गत आयोजित व्याख्यानमालेत विषयावर गुंफताना ते बोलत होते.
ठळक मुद्देविजय कर्नाटकी : दोडी येथे ज्ञान-विज्ञान वाचन चळवळ अभियान