लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगावमधील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तेथील नागरिकांनी पलायन करीत नाशिकमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. चोरट्या मार्गाने महामार्गावर येत ट्रकच्या माध्यमातून दररोज असंख्य मालेगावकर नाशिक शहराच्या सीमारेषेवरील ट्रक टर्मिनसपर्यंत प्रवास करीत आहेत. ट्रक टर्मिनस येथून शहरात येईपर्यंत त्यांना कोणताही अटकाव होत नसल्याने प्रशासकीय तसेच पोलीस यंत्रणेच्या मर्यादाही उघड होत आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी घुसखोर रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. मात्र परप्रांतीयांचे परतीसाठी रस्त्याने दिसणारे लोंढे, जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेले हजारो परप्रांतीय आणि रस्त्याने उगाचच दुचाकीवर हिंडणाऱ्या टवाळांना आवर घालण्यासाठीचे व्यापक प्रयत्न होताना दिसत नाही. कोरोनाचे संकट अधिक गडद झालेले असतानाही बाजारातील गर्दी तसेच झोपडपट्टी परिसरात होत असलेले डिस्टन्स नियमांचा फज्जा याबाबतही प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसते. याच यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा उघड झाल्या असून, मालेगावातून नाशिकमध्ये येणाऱ्यांना अटकाव घालण्याचा कोणताही ‘प्लॅन’ करण्यात आलेले नसल्याचे गेल्या काही दिवसांवरून दिसून आले आहे.मालेगावात शहरात येण्यासाठी अनेक मालेगावकर चाळीसगावफाटा, मनमाड चौफुली तसेच चांदवडमार्गे नाशिक गाठत आहेत. काही लोक मालेगाव-मनमाड आणि चांदवडमार्गे नाशिकला दाखल होत आहेत, तर याच मार्गाने पुढे पिंपळगाव बसवंत मार्गाने नाशिकपर्यंतचा प्रवास केला जात आहे. महामार्गावरून जाणाºया ट्रकचालकांना भरपूर पैसे दिले जात आहे. शहरात जाणे जोखमीचे असल्याने चालकही ट्रक टर्मिनसपर्यंतच सोडण्याचे सांगून प्रवासी नाशिकमध्ये आणत आहेत.दुर्लक्ष की निष्काळजीपणा?वास्तविक पोलीस प्रशासनाने ट्रक टर्मिनस येथे वाहनांची तपासणी करण्याबरोबरच चालकाचीदेखील स्क्रिनिंग करणे अपेक्षित आहे. परंतु तपासणीची कोणतीही प्रक्रिया सक्षमपणे राबविली जात नसल्याचे दिसून येते. टर्मिनसपर्यंत आलेले घुसखोर दिवसा आणि रात्रीही रस्त्याने प्रवास करीत असताना त्यांना कुठेही अडविले जात नसल्याने सध्या नाशिकमध्ये प्रवास करणे अनेकांना सुलभ होऊन बसले आहे. इतके दिवस सर्वसामान्य माणसांवर दंडुका उगारणारे आणि प्रसंगी शिक्षाही ठोठावणाºया पोलिसांच्या नजरा मात्र या घुसखोरांवर खरेच पडत नसेल का? असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.
ट्रक टर्मिनसपासून शहरात होतो घुसखोरांचा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 10:44 PM
नाशिक : मालेगावमधील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे तेथील नागरिकांनी पलायन करीत नाशिकमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. चोरट्या मार्गाने महामार्गावर येत ट्रकच्या माध्यमातून दररोज असंख्य मालेगावकर नाशिक शहराच्या सीमारेषेवरील ट्रक टर्मिनसपर्यंत प्रवास करीत आहेत. ट्रक टर्मिनस येथून शहरात येईपर्यंत त्यांना कोणताही अटकाव होत नसल्याने प्रशासकीय तसेच पोलीस यंत्रणेच्या मर्यादाही उघड होत आहे.
ठळक मुद्देआडगावकडून येण्याºया मार्गावर कुठेही चेकपोस्ट नाही.