शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

तर घुसखोरांमुळे शहर ठरेल ‘डेंजर झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 10:51 PM

नाशिक : देशभरात लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला असताना नाशिकमध्ये मात्र सील बंद असलेल्या सीमा जणू खुल्या झाल्या आहेत. कोणीही या आणि कुठेही जा या धर्तीवर निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहारात घुसखोरी वाढत आहे. खुद्द महापौर आणि महापालिका आयुक्तांनीच हीच बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांना सूचितही केले आहे. परंतु त्यानंतरही शहराच्या सीमा सील झालेल्याच दिसत नसल्याने भविष्यात नाशिकचे मालेगाव झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.

ठळक मुद्देनिर्बंध शिथिल : कोणीही शहरात सहज करू शकतो प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देशभरात लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढविण्यात आला असताना नाशिकमध्ये मात्र सील बंद असलेल्या सीमा जणू खुल्या झाल्या आहेत. कोणीही या आणि कुठेही जा या धर्तीवर निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहारात घुसखोरी वाढत आहे. खुद्द महापौर आणि महापालिका आयुक्तांनीच हीच बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांना सूचितही केले आहे. परंतु त्यानंतरही शहराच्या सीमा सील झालेल्याच दिसत नसल्याने भविष्यात नाशिकचे मालेगाव झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न केला जाऊ लागला आहे.कोरोनाचा संसर्ग अत्यंत सहजगत्या वाढू शकतो हे लक्षात घेऊन केंद्र आणिराज्य शासनाने लॉकडाउन संचारबंदीचा कटू निर्णय जाहीर केला. त्यातील दोन टप्पे संपले परंतु या काळातदेखील काळजी घेतली गेली जात नसल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अखेरीस लॉकडाउनचा तिसरा टप्पा घोषित करण्यात आला. परंतु नाशिक जिल्ह्यात पहिला टप्पा संपत नाही तोच शिथिलता आल्याचे दिसत आहे. विशेष: बाहेरून घुसखोरी करणारे विनासायास शहरात येत असल्याने नाशिक शहरातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे.शहरात आता महापालिकेच्या म्हणण्यानुसारच बाधितांची संख्या अठरावर पोहोचली आहे. यातील तीनेक रुग्ण नाशिक शहरातील मूळ रहिवासी आहेत. बाकी अन्य सर्वच जण बाहेरील असून, त्यांच्यामुळेच शहरात संसर्ग वाढला आहे. यापूर्वी शहरात घुसखोरी करणाऱ्या कामगारांना अडवल्यानंतर क्वारंटाइन असताना तो कोरोनाबाधित असल्याचे आढळले होते. त्यानंतर मानखुर्दवरून नाशिकमार्गे जाणाºया सुरक्षारक्षकांपैकी एकाला कोरोना झाल्याचे आढळले होते. आता तर गेल्या काही दिवसांत मालेगाव येथे कोरोनाबाधितांचा उद्रेक झाल्यानंतर तेथून तसेच धुळे तसेच जळगावहून नाशिक शहरात छुप्या पद्धतीने येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे धोका अधिक वाढू लागला आहे.पोलिसांच्या नाकाखालून येऊन कोणत्याही प्रकारची तपासणी न करताच शहरातील विविध वसाहतींमध्ये वास्तव्याला जाणाºयांमुळे शहरात कोणत्याही क्षणी उद्रेक होऊ शकतो. हीच स्थिती लक्षात घेऊन महपाौर सतीश कुलकर्णी यांनी गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना शहराच्या आणि जिल्ह्यांच्या सीमांवर सीआरपीएफ जवान नियुक्त करण्याची मागणी केली होती. पाठोपाठ आयुक्त राधाकृष्ण गमे यानीदेखील पोलिसांना पत्र दिले आहेत.बाहेरून आलेला रुग्णशहरात शिरलेल्या सिक्युरिटीला लागण मानखुर्दवरून भंडारदरा येथे जाण्यासाठी निघालेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या मित्रांसह शहरात प्रवेश केला. मानखुर्द येथेच त्यांच्यातील एकाला लागण झाल्याचा त्यांना संशय होता. पाथर्डी फाटा येथे (विनाअटकाव) आल्यानंतर मात्र त्यांनी स्वत:हूनच मनपाच्या रुग्णालयात दाखल होऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.दुधाच्या टॅँकरमधून सहज प्रवासजळगाव जिल्ह्यातील भडगाव येथून टॅँकरमधून चोरीछुपे नाशिक शहरात दाखल झालेल्या एकास कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी (दि.२) स्पष्ट झाले. दूध टॅँकर आणि तत्सम मालवाहतूक साधनांची कशाप्रकारे सीमा नाक्यावर तपासणी होते हेच यातून स्पष्ट होते आहे.नाशिक शहरात चोरी-छुपे येणाºयांची संख्या वाढत आहे. शनिवारी (दि.२) एकाच दिवसात सहा ते आठ रुग्ण वाढले. त्याचेच हे परिणाम आहेत. एकीकडे शहरातील स्थिती नियंत्रित असल्याने शहराचा आॅरेंज झोनमध्ये समावेश करण्याची मागणी असताना दुसरीकडे मात्र रुग्ण संख्या वाढत आहे. आता तरी सीमा कडेकोट बंद कराव्या अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.- सतीश कुलकर्णी, महापौर

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या