देवळा : उन्हाळी कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात असतानाच नुकत्याच नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्यावर उपद्रवी किडीचे व रोगांचे आगमन झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती संपायचे नाव घेत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उन्हाळी कांद्याचे विक्र मी उत्पादन निघाल्यानंतर चांगला भाव मिळेल अशा मोठ्या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हा कांदा चाळीत साठवून ठेवला होता. शासनाने आडतबंदीसाठी निवडलेली चुकीची वेळ व या निर्णयाची अंमलबजावणी करताना झालेला एक ते दीड महिन्यांचा कालापव्यय याचा फटका शेतकऱ्यांना बसला. कांद्याचे वितरण या काळात झाले नाही. यामुळे आधीच विक्र मी उत्पादन झालेला कांदा वेळेवर बाजारात येऊ शकला नाही. यातच चाळीत ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडल्याने व बाजारभाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ही कीड रासायनिक औषधांमुळे काही प्रमाणात नष्ट होते. ती पूर्णपणे नष्ट करावी लागते. यासाठी जमिनीखालील किडी शोधून जमा करून नष्ट करावी लागते. हा नवीनच उद्योग सध्या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेतकऱ्यांवर सद्या अस्मानी सुलतानी कोसळली असून, यातून मार्ग कसा काढावा? या काळजीत शेतकरी आहेत. (वार्ताहर) चालूवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यानंतर उन्हाळी कांद्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे आलेल्या नैराश्येतून बाहेर येत मोठ्या आशेने पोळ कांद्याची लागवड केली. यासाठी भांडवल उभे करताना अनंत समस्यांना तोंड द्यावे लागले. या नुकत्याच लागवड केलेल्या कांद्यावर कागळा या उपद्रवी किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. ही कीड जमिनीखाली रहाते व कांद्याच्या रोपांची मुळे कुरतडून टाकते. यामुळे रोपे मरतात व नुकसान होते. यामुळे त्या जागेवर पुन्हा नवीन कांद्याच्या रोपांची लागवड करावी लागते. ही किडी जर नष्ट केली नाही तर पुन्हा ती रोपांचे नुकसान करते.
कांद्यावर रोगाचे आक्रमण
By admin | Published: September 24, 2016 12:22 AM