नाशिक : दहशतवादविरोधी पथकाचे सरकारी वकील अजय मिसर यांची हत्त्या करण्याचा कट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रचल्याचे पोलीस चौकशीत समोर आले असून, या प्रकरणात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी (दि़२७) पत्रकार परिषदेत सांगितले़याबरोबरच अॅड. मिसर यांची सुरक्षा वाढविण्यात आली असून, संबंधित आरोपीचा ताबा घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केल्याचे शिंदे यांनी सांगितले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या ११२ व्या तुकडीच्या दीक्षान्त समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ शिंदे यांनी सांगितले की, मालेगाव बॉम्बस्फोट, दहशतवादविरोधी पथक, मोक्का न्यायालय तसेच विविध प्रकारच्या गंभीर गुन्'ांच्या खटल्यांमध्ये अॅड़ मिसर हे सरकारची बाजू मांडतात़ नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात त्यांच्या हत्त्येचा कट रचला जात असल्याचे व त्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाइलची माहिती मुंबई मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे निनावी पत्राद्वारे पाठविण्यात आली होती़ यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया, अॅडीशन डीजी मीरा बोरवणकर, नाशिकचे पोलीस आयुक्त एस़ जगनाथन यांना चौकशीचे आदेश दिले होते़ या चौकशीत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या मोक्का कैदी बराकमध्ये हा हत्त्येचा कट रचल्याचे व मोबाइलचा वापर केल्याचे समोर आले आहे़ मध्यवर्ती कारागृहात कट रचण्याचे षडयंत्र रचले जाणे ही गंभीर बाब असून, कारागृहात मोबाइल कसा पोहोचला, याबाबत जेल प्रशासनाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़ तसेच मिसर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, गुन्'ाच्या सखोल तपासासाठी आरोपीचा ताबा मिळावा, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले़
मिसर हत्त्या कटप्रकरण जेल प्रशासनाची चौकशी
By admin | Published: June 28, 2015 1:41 AM