शिक्षण उपसंचालकांना याबाबतचे आदेश देण्यात आले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल शिक्षण विभागाने मागविला आहे. त्यामुळे झनकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या शाळांच्या प्रकरणांची व प्रस्तावांमुळे शाळा चालकांचेही धाबे दणाणले आहेत.
चौकट===
धुळ्यात दीड महिन्यात ४१२ प्रकरणांना मान्यता
माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना झनकर यांना धुळे येथीलही अतिरिक्त पदभार देण्यात आला. जेमतेम दीड महिना झनकर यांच्याकडे कार्यभार होता. या काळात त्यांनी ४१२ प्रकरणांना मान्यता दिल्याचे सांगण्यात येते. दीड महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रस्तावांना मान्यता कशी काय देता येऊ शकते, याबाबतही शिक्षण विभागाला संशय आहे. विशेष म्हणजे धुळे येथील अतिरिक्त पदभार देत असताना नजीकच्या नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना डावलून झनकर यांच्यावर शिक्षण विभागाने मर्जी दाखविण्याचे कारण काय, याचीही आता चर्चा होत आहे.