नाशिक : मुदत ठेवीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत गुंतवणूकदारास मुद्दल व त्यावरील व्याज न देता शहरातील ज्योती बुक सेलर्स अॅण्ड स्टेशनरीच्या संचालकांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी संशयित ज्योतिराव दगडू खैरनार (५५, रा़ कल्पवृक्ष, दुसरा मजला, जीवन छाया, मुरकुटे कॉलनी, गंगापूररोड, नाशिक) विरोधात फसवणूक, अपहार तसेच महाराष्ट्र ठेवीदार व हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पंचवटीतील गणेशवाडी येथील रहिवासी प्रभाकर पंडित घोडे (६६) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित ज्योतिराव खैरनार यांनी २ जुलै २०१४ पासून मुरकुटे कॉलनीत ज्योती बुक सेलर्स अॅण्ड स्टेशनरी या नावाच्या संस्थेमार्फत मुदत ठेव योजना सुरू केली. या मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतविल्यास प्रतिवर्षी १२ टक्के व्याज मिळेल, असे आमिष दाखविले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक या गुन्ह्याचा तपास करीत आहेत़ आमिषास बळी पडून घोडे यांनी दोन लाख रुपये मुदत ठेवीमध्ये गुंतविले़ २ जुलै २०१५ रोजी या ठेवीची मुदत संपल्यानंतरही संशयित खैरनार यांनी घोडे यांनी गुंतविलेली रक्कम व त्यावरील व्याज परत न करता या पैशांचा अपहार करून फसवणूक केली़
ज्योती बुक सेलर्सच्या संचालकांकडून गुंतवणूकदाराची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:27 AM