शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

केएफएस कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक

By admin | Published: October 31, 2015 12:17 AM

ग्रामीण गुंतवणूकदार : पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक : केबीसी, समृद्धी इन्व्हेस्टमेंट, विकल्प ट्रेड सोल्यूशन यासारख्या कंपन्यानी गुंतवूणकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची उदाहरणे आहेत़ या कंपन्यांमध्ये आता संभाजी चौकातील केएफएस मल्टि सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची भर पडली आहे़ गुंतवणुकीवर बँकेपेक्षा अधिक व्याजदर व फायद्यांचे आमिष दाखवून या कंपनीने गुंतवणूकदारांची सुमारे ४० लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी दिली आहे़ यातील बहुतांशी गुंतवणूकदार हे निफाड तालुका व ग्रामीण भागातील आहेत़निफाड तालुक्यातील दात्याने येथील गोरखनाथ पोपटराव गुरगुडे (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सोमनाथ बंड नेहे (रा़ गाव नाव माहिती नाही) यांनी केएफएस मल्टि सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली़ या कंपनीचे कार्यालय संभाजी चौकातील बाफणा ज्वेलर्ससमोरील एनडीए टॉवरमध्ये आहे़ बँकेपेक्षा अधिक व्याजदर व इतर फायदे देण्याचे आमिष दाखवून संशयित नेहे यांनी गुरगुडे यांची मार्च २०१४ पासून आतापर्यंत १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली़केएफएसने गुरगुडे यांचे साथीदार रमेश तुळशीराम गांधी (रा़सुकेणे), हरी अण्णा थेटे (रा़दात्याने), अल्तिफ सय्यद अमजद अतीफ (रा़सय्यद पिंप्री), समीर इस्माईल सय्यद (रा़आडगाव), दिगंबर जनार्दन राऊत, रावसाहेब बाळासाहेब मोरे (शिरसगाव), देवीदास जयराम मोरे (थेरगाव) या सर्वांची मिळून एकूण ४० लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करून या पैशांचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंरक्षण कायद्यान्वये कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)