सातपूर : मुंबई, पुण्यापाठोपाठ उदयोन्मुख शहर म्हणून नाशिकचा लौकिक लक्षात घेऊन गुंतवणुकीसाठी स्पेनच्या गुंतवणूकदारांचीनाशिकला पसंती असेल, असे आश्वासन स्पॅनिशच्या बास्कट्रेड, इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवसाय मार्गदर्शक मिकेल गोरसिया यांनी दिले. नाशिक, सिन्नर येथील औद्योगिक क्षेत्रात उत्पादनात असलेल्या बलेटो या अॅग्रोबेस कंपनीला स्पॅनिशच्या शिष्टमंडळाने भेट देऊन परिसरातील गुंतवणुकीच्या संधींची माहिती घेतली. त्यानंतर निमा येथे उद्योजकांशी संवाद साधताना त्यांनी स्पॅनिश उद्योगांची माहिती दिली. मुंबई, पुण्यापाठोपाठ केवळ नाशिकचाच विचार केला असल्याचे सांगून, औरंगाबाद व नागपूरला नकार दिल्याचेही नमूद केले. नाशिकची हवाई दळणवळण सेवा सक्षम झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्या समवेत इडोया एस्पिलागो, हेमंत अग्रवाल यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी उद्योग सहसंचालक पी.पी. देशमुख, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील तसेच निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष शशिकांत जाधव, मंगेश पाटणकर, तुषार चव्हाण, श्रीकांत बच्छाव, नीलिमा पाटील, कमलेश नारंग आदींसह उद्योजक उपस्थित होते.
गुंतवणूकदारांची मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:28 AM