नाशिक : पंतप्रधान आवास योजनेच्या नाशिक जिल्ह्यातील लाभार्र्थींशी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला असता, जवळपास सर्वच लाभार्र्थींनी या योजनेचे स्वागत करून घराचे स्वप्न साकार झाल्याबद्दल फडणवीस यांना धन्यवाद देऊन घरी येण्याचे आमंत्रण दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आवास योजनेच्या लाभार्र्थींचे या ‘सु-संवादा’साठी मनधरणी करणाऱ्या अधिकाºयांना हायसे वाटले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे दोन तास हा संवाद सुरू असताना त्यातून अधिकारी व प्रसिद्धिमाध्यमांना मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले.शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाºया अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली असून, त्याचाच भाग म्हणून बुधवारी पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींशी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात जवळपास सर्वच लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभामुळे घराचे स्वप्न साकार झाल्याबद्दल सरकारचे आभार मानले. मुख्यमंत्री लाभार्थाींशी थेट संवाद साधणार असल्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेचे व योजना राबविणाºया अधिकाºयांचे कौतुक करावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक अधिकाºयांकडून अशा लाभार्थ्यांना शोध व त्यांना ‘धडे’ देण्याचे काम केले जात होते. त्यामुळे बुधवारी अशाच मोजक्या लाभार्थींना या संवादासाठी पाचारण करण्यात आले व अपेक्षेप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिसादही दिला.सकाळी अकरा वाजता सुरू झालेला हा संवाद दुपारी एक वाजेपर्यंत चालला. या संवादाच्या वेळी कोणत्याही शासकीय अधिकाºयाने उपस्थित राहू नये, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री कार्यालयातून असल्यामुळे खुद्द जिल्हाधिकाºयांनीही त्यासाठी वेळ दवडला नाही तर लाभार्थींना घेऊन आलेल्याअन्य अधिकाºयांनी लांबूनच ‘दर्शन’ घेतले. नाशिक तालुक्यातील महिरावणी येथील एका लाभार्थ्याने थेट घरातूनच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असता, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गृहसजावटीचे कौतुक केले. त्यावर सदर महिलेने मुख्यमंत्र्यांना गृहभेटीचे आमंत्रण दिले.प्रिंपी सय्यदला भेट द्यानाशिक तालुक्यातील प्रिंपी सय्यद येथील दशरथ लोखंडे या लाभार्थीने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना प्रिंपी सय्यद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंचा ऐतिहासिक स्तुप असल्याची माहिती देऊन गावाच्या विकासासाठी एकदा प्रिंपी सय्यद येथे भेट देण्याची विनंती केली. साहेब, दुष्काळाकडे लक्ष द्यामुख्यमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींशी संवाद साधणार असल्यामुळे सर्व लाभार्थी घरकुल योजनेचेच असले तरी, सिन्नरच्या रज्जब सय्यद या लाभार्थ्याने मुख्यमंत्र्यांचे या योजनेबद्दल कौतुक करतानाच थेट सिन्नरच्या दुष्काळाचा विषय काढून ‘साहेब, सिन्नर तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असल्याने त्याकडेही लक्ष द्या’ असे आर्जव केले. लाभेच्छुकाचा संतापपंतप्रधान आवास योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करणारे सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील रमेश भगत या लाभेच्छुकाने मुख्यमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमात सहभागी होऊ देण्यासाठी आग्रह धरला. मंगळवारीच आपण मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपली कहाणी सांगितली असून, त्यांनी या संवादात आपले गाºहाणे मांडण्याची अनुमती दिली असल्याचे भगत यांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यांनी मंत्रालयाचा पासदेखील पुराव्यादाखल अधिकाºयांना दाखविला. परंतु अधिकाºयांनी सदरचा संवाद फक्त लाभार्थ्यांशी असल्यामुळे बसता येणार नसल्याचे सांगितले.
घरकूल योजनेच्या लाभार्थींचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 12:44 AM
नाशिक : पंतप्रधान आवास योजनेच्या नाशिक जिल्ह्यातील लाभार्र्थींशी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला असता, जवळपास सर्वच लाभार्र्थींनी या योजनेचे स्वागत करून घराचे स्वप्न साकार झाल्याबद्दल फडणवीस यांना धन्यवाद देऊन घरी येण्याचे आमंत्रण दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आवास योजनेच्या लाभार्र्थींचे या ‘सु-संवादा’साठी मनधरणी करणाऱ्या अधिकाºयांना हायसे वाटले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे दोन तास हा संवाद सुरू असताना त्यातून अधिकारी व प्रसिद्धिमाध्यमांना मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले.
ठळक मुद्देसंवाद : अधिकारी, प्रसिद्धिमाध्यमांना ठेवले बाहेर