शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मिळतेय डेंगुला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:52 PM

नाशिक : ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्याच ठिकाणी रुग्णांना रोग जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या जवळ ...

ठळक मुद्देअतिक्रमणाचे भंगार साहित्यही पडलेले आढळून येत आहेरिकामे टायरे, कचरापेटीत पावसाचे पाणी ; डासांचा उपद्रव

नाशिक : ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्याच ठिकाणी रुग्णांना रोग जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या जवळ कचऱ्याचे साम्राज्य बघायला मिळत असून रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ रिकामे टायरे, भंगार कचरापेट्या तसेच फाटलेले कपडे पडलेले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी डेंगुच्या डासांना आयते आमंत्रण मिळत आहे. त्यातच या भागातील काही दिवसांपुर्वी काढलेल्या अतिक्रमणाचे भंगार साहित्यही याठिकाणी पडलेले आढळून येत आहे. तसेच आवारात पावसाच्या पाण्याचे डबके साचत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे.जिल्हा शासकिय रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील मोठ्या प्रमाणावर रुग्ण आपल्या उपचारासाठी येत असतात. मोफत उपचार मिळण्याच्या दृष्टीने याठिकाणी रोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येत असतात. अशात याठिकाणी प्रशासनाकडून त्यांना चांगले उपचार मिळणे अपेक्षित आहेतच मात्र रुग्णालयाच्या आवारात स्वच्छतेच्या दृष्टीने उपाययोजना करणेही तितकेच महत्वाचे आहे. रुग्णालयामध्ये नागरिकांसाठी डेंगु, मलेरीया, स्वाईन फ्लु सारख्या आजारांसाठी जनजागृतीपर पोस्टर लावण्यात आले आहे. मात्र रुग्णालयाकडून आवारात स्वच्छतेकडे दुर्लंक्ष करण्यात येत आहे. रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. काही दिवसांपुर्वी संरक्षण भिंतीजवळ असलेल्या चहाच्या टपºया, दुकाने हटविण्यात आली होती. मात्र त्यातील भंगार साहित्य असूनही आवारात पडून आहे. यामध्ये रिकामे टायरे, कचरा, फाटलेले कपडे कित्येक दिवसांपासून पडून आहे. मात्र अद्यापही याठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न प्रलंबित दिसत आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाºया रुग्णांना प्रवेशद्वाराजवळच असे चित्र दिसत असल्यामुळे ते रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.डेंगुला मिळतेय आमंत्रण :मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे रुग्णालयाच्या बाहेर पाण्याचे डबके साचले होते. मात्र पाऊसाने उघडीप दिल्यानंतरही याठिकाणी साचणाºया डबक्यांची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नाही. तसेच पुन्हा शहरात पावसाचा जोर वाढल्यामुळे याठिकाणी पुन्हा मोठे डबके साचले आहे. तसेच याठिकाणी पडलेल्या टायरमध्ये पावसाचे पाणी साचले असून त्यात मोठ्या प्रमाणावर डासांची निर्मिती होत असतांना दिसत आहे. त्यात याठिकाणी साचलेला कचरा रुग्णालयाला विद्रुप करत आहे. त्यामुळे डेंगु, मलेरिया सारख्या आजरांना याठिकाणी आयते आमंत्रणच मिळत आहे. 

रुग्णालयात खोकल्याच्या उपचारासाठी आलो असता रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून येत होता. जवळ गेलो असता याठिकाणी रिकामे टायरे,कचरापेट्या आढळल्या तसेच त्यात पावसाचे पाणी साचले असुन त्यामध्ये मच्छरांचा वावर असल्याचे दिसले. त्यामुळे रुग्णालयात उपचार घ्यावा का नाही हा प्रश्न पडला. यावर येथील सुरक्षारक्षकांना याबाबत सांगून सुद्धा त्यांच्याकडुनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.यशवंत फसाळे, रुग्ण 

टॅग्स :Nashikनाशिकdengueडेंग्यूHealthआरोग्य