नामपूर : ग्रामीण भागात खाजगी कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने मजुरी करणाऱ्या कर्जदारांना कोरोनाबरोबर नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना काळापासून आजपर्यंत प्रत्येकाची आर्थिक स्थिती बिघडल्याने खाजगी कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी कर्जदारास वेढीस धरू नये. कर्ज वसुली त्वरित न थांबविल्यास कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोको आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे.नामपूर परिसरातील तसेच काटवन परिसरात गेल्या पाच वर्षांपासून कर्ज पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपन्यांनी छोटे व्यावसायिक, महिला आदींना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला आहे. व्याज तसेच छुपे खर्च आदी माथी मारून व्यापार सुरु असल्याच्या तक्रारी काही कर्जदारांनी केल्या आहे. मजुरी करणाऱ्या सामान्य नागरिकांचे हाल झाले. व्यवसाय, मजुरी बंद झाल्याने नागरिकांनी जीव मुठीत धरून कोरोनाशी लढा दिला. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, मात्र कर्ज घेतलेल्या खाजगी कंपन्या यात बचत गट, पतसंस्था, फायनांन्स कंपन्यांनी वसुलीचा धडाका सुरु केल्याने ग्रामीण भागात सर्व सामान्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्यांना खाजगी कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था वसुलीच्या नावाखाली व्यापार करत आहेत. अशातून सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. कर्ज वसुली त्वरित थांबली पाहिजे. खाजगी अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांना सरकारने निर्देश देऊन वसुली थांबवावी.- सचिन अहिरराव, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड.
ग्रामीण भागात कर्ज वसुलीसाठी खाजगी कंपन्यांचा तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 6:37 PM
नामपूर : ग्रामीण भागात खाजगी कंपन्यांचा कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू केल्याने मजुरी करणाऱ्या कर्जदारांना कोरोनाबरोबर नवीन संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोना काळापासून आजपर्यंत प्रत्येकाची आर्थिक स्थिती बिघडल्याने खाजगी कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी कर्जदारास वेढीस धरू नये. कर्ज वसुली त्वरित न थांबविल्यास कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोको आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे.
ठळक मुद्देछुपे खर्च आदी माथी मारून व्यापार सुरु असल्याच्या तक्रारी