नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदाकाठावर बांधण्यात आलेल्या घाटाच्या समोर बसविण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड््सची दुरवस्था झाली आहे. नदीला आलेल्या पुरात अनेक ठिकाणचे बॅरिकेड््स वाहून गेले तर काही ठिकाणी पावसाळ्यापूर्वीच लोखंडी बॅरिकेड््सची चोरी झाली आहे.घाटाच्या परिसरात संरक्षण म्हणून बसविण्यात आलेल्या लोखंडी पाइपदेखील आता दिसेनासे झाले आहेत. विशेषत: पंचवटी आणि टाकळी परिसरातील गोदाकाठावर बसविण्यात आलेल्या या साहित्यांची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. तपोवन येथेदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. पुरात आणि चोरीमुळे पात्रावर अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेतील लोखंडी खांब उभे असल्याचे दिसून येते.स्नानासाठी तयार करण्यात आलेल्या घाटासमोरील लोखंडी कथडेच नव्हे तर नदीवरील लहान-मोठ्या पुलावरील लोखंडी कथडेदेखील वाहून गेल्याने त्यांची दुरवस्था कायम आहे. यापूर्वी काही ठिकाणी लोखंडी पाइप बसविण्यात आले होते. पुराच्या पाण्यात ते पुन्हा वाहून गेले. रामकुंडापासून ते दसक येथील घाटापर्यंत टाकण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेड््सची अनेक ठिकाणी चोरीदेखील झालेली आहे.
घाटावरील लोखंडी बॅरिकेड््सची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 11:55 PM
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदाकाठावर बांधण्यात आलेल्या घाटाच्या समोर बसविण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड््सची दुरवस्था झाली आहे. नदीला आलेल्या पुरात ...
ठळक मुद्देमनपाचे दुर्लक्ष : लोखंडी पाइपची चोरी