ओझटाऊनशिप : आरोगय कर्मचाऱ्यांना सतत विलंबाने होणाºया वेतनासंदर्भात जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी आरोग्य उपसंचालकांची भेट घेऊन आपली कैफियत मांडलीआरोग्य कर्मचाºयांचे वेतन सतत विलंबाने होत असल्याच्या कारणास्तव जि. प. आरोग्य कर्मचारी संघटना नाशिकचे अध्यक्ष विजय सोपे यांनी आरोग्य उपसंचालक पट्टण शेट्टी यांची भेट घेतली व सर्व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाºयांच्या व्यथा कथन केल्या.जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या वेतनासाठी एकूण ९ लेखाशिर्ष असून विभागाकडून सातत्याने वेतनासाठी वेळेत मागणी करून सुद्धा अनुदान उपलब्ध करून दिले जात नाही अथवा पुरेशा प्रमाणात अनुदान मिळत नसल्याने काही लेखाशीर्षाखालील कर्मचाºयांचे वेतन २ ते ३ महिने विलंबाने होत आहे. तसेच आरोग्य कर्मचाºयांचे वेतन सातत्याने प्रत्येक महिन्याच्या २० तारखेनंतर होत आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाºयांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे.त्याकरीता यापुढे कर्मचाºयांच्या वेतनाकामी अनुदान २५ तारखेच्या आत पुरेशा प्रमाणात उपलब्ध करु न देण्यात यावे अशी विंनती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भैया अहिरराव, सुरज हरगोडे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.