नाशिक, दि. १७ - केवळ पोलीसच नाही तर रेल्वे पोलीस भरती, सैन्य भरती, सीआरएसएफ , वनभरती या पदांसाठी लेखी परीक्षेबरोबरच शारीरिक चाचणी आवश्यक आहे़ हे खरे असले तरी शारीरिक चाचणी घेण्याच्या वेळेबाबत भरीत प्रक्रिया राबविणाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे मुंबई येथील उदाहरणांवरून दिसून येते़ या भरती प्रक्रियेत मृत्यू पावलेल्या युवकाच्या मृत्यूस संबंधित सरकारी यंत्रणेला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून केली जाते आहे़रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यूपोलीस भरतीप्रमाणेच रेल्वे पोलिसांचीही भरती प्रक्रिया राबविली जाते़ पुण्यातील ताडीवाला रोडवरील मैदानात रेल्वे भरतीच्या शारीरिक चाचणीत धावताना एका तरु णाचा मृत्यू झाला. ही घटना ताडीवाला रोडवरील मैदानात सोमवारी सकाळी घडली.स्वप्नील राजभिये (रा. गोंदिया) असे या तरुणाचे नाव आहे. रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे भरती विभागाकडून ग्रेड बी पदासाठी आज भरती सुरू होती. स्वप्नील सकाळी सात वाजताच ताडीवाला रोड येथील मैदानात आला होता. या चाचणीत निर्धारित वेळेत एक हजार मीटर धावायचे होते. साधारण नऊच्या सुमारास स्वप्नीलचा क्र मांक आला. त्याने धावण्यास सुरु वात केली. जिवाच्या आकांताने तो धावत होता. पण हे अंतर पूर्ण करण्यापूर्वीच तो ट्रकवर कोसळला. पण उठून तो पुन्हा धावू लागला आणि त्याने हे अंतर पूर्ण केले. त्यानंतर दोन ते तीन मिनिटातच तो पुन्हा खाली कोसळला. त्याला तत्काळ तेथील तंबूत हलविण्यात आले त्या ठिकाणी त्याला सलाईन लावण्यात आले तरी तो शुद्धीवर येऊ शकला नाही. त्याला रिक्षाने रेल्वे रु ग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. भरतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका नसल्याचा आरोप भरतीसाठी आलेल्या तरुणांनी केला. यावर दुसऱ्या कामासाठी रुग्णवाहिका बाहेर गेली असल्याने ती उपलब्ध होऊ शकली नसल्याचे रेल्वे भरती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.पोलीस भरतीची शिक्षा मृत्यूगडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील युवक पोलीस व्हायचं स्वप्नही पाहू शकत नाहीत. कारण पोलीस भरतीत अपयश आल्यास त्यांच्या स्वप्नाची भयानक शिक्षा म्हणजे मृत्यूही असू शकते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील अनेक युवक पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पाहतात़ या भरती प्रक्रियेत पास झाले तर चांगले, पण समजा अपयश आले तर? मग नापास झालेल्यांचा किंवा हे स्वप्न पाहणाऱ्यांचा प्रवास मृत्यूच्या दाढेत येऊन थांबतो. काही वर्षांपूर्वी धानोरा तालुक्यातील बेंडीकणार येथील तरुण बाजीराव कोवाची नावाच्या तरुणाला अत्यंत निर्दयतेने ठार मारण्यात आले होते़ बाजीरावचा दोष इतकाच की त्याने पोलिसांत भरती होण्याचं स्वप्न पाहण्याचा गुन्हा केला अन् दुर्दैवाने त्यात अपयशी ठरलाग़डचिरोली भागातील नक्षलवादी पोलिसांना आपले शत्रू मानतात़ त्यांच्यात सामिल होण्याची स्वप्न बाजीरावने पाहिले, कागदपत्रे घेऊन गडचिरोली गावात भरती प्रक्रियेची विचारपूस करण्यासाठी तो गेल्याचा त्यांना राग आला़ पाच नक्षलवाद्यांनी त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांसमोर त्याला फ रफटत जंगलात नेले़ एका झाडाला बांधून मरेपर्यंत त्याला मारले आणि त्याचा मृतदेह गावात आणून टाकला़ पोलिसात जाणाऱ्या युवकांना नक्षलवाद्यांनी दिलेला एक इशाराच होता़ पोलीस भरतीत अपयश आल्यास असे अनेक बाजीराव कायमचे गावाला आणि आई-वडिलांना कायमचे मुकतात कारण भय इथले संपत नाही. काही युवक मृत्यूच्या भीतीने गावाकडे परतत नाहीत. त्यांच्या आईवडिलांनाही नक्षलवादी त्रास देतात. नक्षलवाद्यांची स्थानिक युवकांवर करडी नजर असते. भरतीला गेलेला युवक परतला की, त्याचा अंत ठरवण्यात नक्षलवादी टपलेले असतात.
सरकारी यंत्रणेचा बेजबाबदारपणा़़़
By admin | Published: June 18, 2014 12:35 AM