लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : चालू महिन्यात वीज वितरण कंपनीने मीटररीडिंग न घेता अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइं युवक आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. वीज वितरणचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.वाढीव बिले तत्काळ कमी करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा नेते गंगाभाऊ त्रिभुवन, युवा तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे, विशाल पाटील, प्रमोद आहिरे, आश्विन केदारे, मनीष चाबूकस्वार आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.नागरिक मेटाकुटीसकोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात महावितरण कंपनीने ग्राहकांना सरासरी बिल पाठविले आहे. त्यात बिल आकारणी व वीजवापर यात मोठी तफावत आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकºया गेल्या तर काहींचे व्यवसाय बंद असल्याने सर्वसामान्य जनता संकटाचा सामना करत आहे. त्यात वीज कंपनीने ग्राहकांना वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. वाढीव रक्कम कमी करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
वाढीव वीजबिलांनी संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:26 PM
मनमाड : चालू महिन्यात वीज वितरण कंपनीने मीटररीडिंग न घेता अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देमनमाड : रिपाइंचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन; मागण्यांचे साकडे