शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

वाल्मीकीनगरला इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:14 AM

--- इमारतीच्या जलकुंभावरून कोसळून युवक ठार पंचवटी : म्हसरूळ शिवारातील दुर्गानगर येथे एका चार मजली इमारतीवरील जलकुंभावरून खाली कोसळून ...

---

इमारतीच्या जलकुंभावरून कोसळून युवक ठार

पंचवटी : म्हसरूळ शिवारातील दुर्गानगर येथे एका चार मजली इमारतीवरील जलकुंभावरून खाली कोसळून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे राहणारा अंकुश रामनाथ गायकवाड (२८) हा त्याच्या नातेवाइकाकडे राहत होता. काल बुधवारी तो घरातून बाहेर गेला व शेजारी असलेल्या एका चारमजली इमारतीच्या गच्चीवर बांधलेल्या जलकुंभावर चढला असता तेथून पाय घसरून जमिनीवर कोसळला. या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मयत युवक हा मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

----

कोयत्याने वार करत जबरी लूट; तिघांवर गुन्हा दाखल

पंचवटी : लासलगाव येथून घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून डाव्या हातावर कोयत्याने हल्ला करत जखमी करून बळजबरीने खिशातील १८ हजार ८०० रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा गुन्हा घडला.

याबाबत पाथर्डी गाव येथे राहणाऱ्या सोमनाथ कचरू पालवे याने आडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री पालवे व त्याचा मित्र भारत तायडे असे दोघे जण लासलगाव येथून दुचाकीने घराकडे जात असताना औरंगाबाद-निलगिरीबाग रोडवरील सिग्नलवर पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवावरून आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी रोखून काही कारण नसताना दोघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या खिशातील १८ हजार ८०० रुपये काढून घेत तायडे याच्या डाव्या हातावर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच पोलिसांत तक्रार दिली तर तुम्हाला ठार मारू, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

---

सराईत गुंडांकडून तलवारीने युवकावर हल्ला

नाशिक : कुरापत काढून संशयितांनी मिळून एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गंगापूर सातपूर लिंक रोडवरील मोतीवाला कॉलेजसमोर घडली. या हल्ल्यात आशिष सुनील दत्त महिरे (२४, रा. शिवाजीनगर) हा युवक जखमी झाला आहे.

आशिष याच्या फिर्यादीनुसार संशयित अक्षय उत्तम भारती, अनिकेत विजय पगारे, रवी ऊर्फ माया दामोदर गांगुर्डे (२१, रा. शिवाजीनगर) यांनी मंगळवारी (दि.१६) हल्ला केला. वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या मुलांनी भांडण केले अशी कुरापत काढून संशयितांनी आशिषला मारहाण केली. तलवारी व कोयत्याने आशिषवर हल्ला चढवून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. यातील अक्षय भारती याच्याविरोधात घरफोडी, दरोडा, जबरी चोरी असे १२ गुन्हे दाखल आहेत. तर रवी गांगुर्डे विरोधात दरोड्याचा व अनिकेत पगारे विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.