ठळक मुद्दे शेतजमिनीतील गवत काढत असताना त्यांना सर्पाने चावा
वणी : शेतजमिनीतील गवत काढत असताना गवतात लपलेल्या विषारी सर्पाने दंश केल्याने परमोरी येथील इसमाचा मृत्यू झाला आहे. गुलाब काळोगे हे शेतजमिनीतील गवत काढत असताना त्यांना सर्पाने चावा घेतला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद वणी पोलिसांनी केली आहे.