कळवण : निसर्गाच्या सानिध्यात असलेली भव्य दिव्य इमारत आणि आवारात असलेल्या झाडांवरील पक्ष्यांचा किलबिलाट, शिवाय त्यांच्यासाठी फांद्यांवर केलेली पाण्याची सोय अन् हाकेच्या अंतरावर असलेले गाव असे मनाला प्रफुल्लित करणारे वातावरण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहाचे असून सहा आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह व एक आश्रमशाळा असे सात आयएसओ मानांकन मिळाले असून असे मानांकन मिळवणारे कळवण प्रकल्प हे राज्यातील पहिले प्रकल्प कार्यालय ठरले आहे.प्रकल्प अंतर्गत शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह दळवट,मानूर, नाकोडे,मालेगाव,बोरगाव. मुलांचे वसतिगृह सुरगाणा असे सहा वसतिगृह व एकलव्य मॉडेल रेसिडेन्शी स्कुल अजमेर सौंदाणे यांना आय एस ओ मानांकन मिळाले.शासकीय वस्तीगृहात राहून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिसाठी अभ्यासोपयोगी विविध सोयीसुविधा पुरवणे महत्वाचे असले तरी विद्यार्थ्यांच्या विकासाला उपयुक्त ठरेल असे वसतिगृहांमध्ये प्रसन्नता वाढवेल असे वातावरण तयार केलेले आहे. शासकीय वसतिगृह दळवट हे यासाठी अत्यंत समर्पक उदाहरण ठरले असून मानांकन मिळालेले वसतिगृह देखील तितकेच उल्लेखनीय कामकाज विद्यार्थिनी आणि वसतिगृहातील गृहपाल यांच्या संकल्पेतून या वस्तीगृहात विविध कल्पना आकाराला आलेल्या आहेत.वसतिगृहाच्या आवारात विविध जातींची झाडे असून निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या शाळा व वस्तीगृह गुणवत्तेकरीता योग्य असे ठरले आहेत. वस्तीगृहात मुला/मुलींना सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रंथालय, आर.ओ.वॉटर प्युरिफायर, इिन्सनेटर मुलीना खेळण्यासाठी सर्व साहित्य उपल्बध करून दिलेले आहेत. सर्व भीतीनं कलर देऊन संदेश देण्यात आले. त्या सुविचारांचा मुलां/मुलींना शिक्षणासाठी फायदा ठरत आहे. मुलां/मुलींना वसतिगृह म्हणजे स्वत:च घर वाटू लागले आहे. वस्तीगृहातील मुली कलापथकासह अनेक खेळाच्या स्पर्धामध्ये आज अनेक जिल्हा राज्य पातळी वर चमकले आहे. कुस्ती, कबडी, खो खो, हॅलीबॉल, फुटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेत बिक्षसे मिळवली आहे.वसतिगृहाला आयएसओ मानांकन देणे हाच उद्देश न ठेवता गुणवत्ता पूर्ण काम करत राहणे हे महत्वाचे आहे असे वसतिगृहातील गृहपाल सुवर्णा पगार व पल्लवी वाठ यांनी मत व्यक्त केलंय. तर प्रकल्पातील सर्व शाळा व वसतिगृह सोयीसुविधा व गुणवत्तापूर्ण असतील याकरीता प्रकल्प कार्यालय शासन कार्यरत आहे. अजूनही शाळा वसतिगृह हे आय एस ओ नामांकन मिळवतील असा विश्वास प्रकल्पधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी व्यक्त केले.प्रकल्पाअंतर्गत असलेल्या सर्व आश्रम शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा देणे व शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे. त्याकरिता सर्व गृहपाल व मुख्याध्यापक यांना तसे वेळोवेळी प्रकल्प कार्यालय व शासन मार्फत विविध मार्गदर्शन व प्रशिक्षण असे देण्यात येते.डॉ. पंकज आशिया.प्रकल्प अधिकारी, कळवण.
सात शासकीय वसतिगृहांना आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 5:52 PM
कळवण : निसर्गाच्या सानिध्यात असलेली भव्य दिव्य इमारत आणि आवारात असलेल्या झाडांवरील पक्ष्यांचा किलबिलाट, शिवाय त्यांच्यासाठी फांद्यांवर केलेली पाण्याची सोय अन् हाकेच्या अंतरावर असलेले गाव असे मनाला प्रफुल्लित करणारे वातावरण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहाचे असून सहा आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह व एक आश्रमशाळा असे सात आयएसओ मानांकन मिळाले असून असे मानांकन मिळवणारे कळवण प्रकल्प हे राज्यातील पहिले प्रकल्प कार्यालय ठरले आहे.
ठळक मुद्देकळवण प्रकल्प : आश्रमशाळेची ही निवड ; राज्यातील पहिले कार्यालय