उद्घाटन समारंभ पार पडला.
शहराची सद्य:स्थिती पाहता ज्या व्यक्तींना घरांमध्ये विलगीकरणाची सोय नाही अशा लोकांसाठी विलगीकरण कक्ष सिटू भवन खुटवडनगर येथे सुरू करण्यात आला आहे. या सेंटरमध्ये ५० बेड उपलब्ध करून दिले गेले आहेत. महिलांसाठी २५ बेड आणि पुरुषांसाठी वेगळा कक्ष २५ बेडचा स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या कोविड पेशंटला नाष्टा, चहा, दोनवेळचे जेवण आणि राहण्याची सोय संपूर्ण मोफत केली जाणार आहे. याशिवाय त्यांना त्यांच्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेण्याची सुविधा आहे. पेशंटने स्वत:हून आपले मेडिसिन घेऊन यायचे आहे व या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली स्वयंसेवक आणि नर्स नेमले गेले आहेत. ऑक्सिजनसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व वाफ घेण्याचे उपलब्ध आहेत. तसेच मनोरंजनासाठी टीव्ही, संगीत ऐकण्यासाठी साऊंड सिस्टीम त्याचप्रमाणे कॅरम बोर्ड, बुद्धिबळ उपलब्ध आहे.
या आयसोलेशन सेंटरमध्ये चळवळीच्या मदतीने सुरू झालेला हा विलगीकरण कक्ष नाशिककरांसाठी खुला करण्यात आला आहे.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक अल्फ इंजिनियरिंग कंपनीचे एचआर हेड रमेश नायर त्याचबरोबर केंद्रीय कमिटी उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, माकपचे माजी नगरसेवक तानाजी जायभावे, सिटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ. सीतारामजी ठोंबरे, प्रा. मिलिंद वाघ, शामला चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी सई कावळे, अनिकेत भोसले, निखिल भुजबळ, तल्हा शेख, प्रणित पवार, भरत शेलार व सिटूचे सेक्रेटरी संतोष काकडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, दिनेश सातभाई, प्रा. व्यंकट कांबळे आदी उपस्थित होते.
(फोटो ११ सिडको१)