शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

विकासाचा मुद्दा दूर, आरोप-प्रत्यारोपांनीच गाजले मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:53 AM

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराचे ताबूत शनिवारी (दि. १९) थंडावतील. जिल्ह्यात कॉँग्रेसवगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवून दिला.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या राजकीय दिवाळीत कुणी फोडले सुतळी बॉम्ब, तर कुणी उडविल्या फुलबाज्या, नेत्यांच्या भाषणांची रंगत

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराचे ताबूत शनिवारी (दि. १९) थंडावतील. जिल्ह्यात कॉँग्रेसवगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवून दिला.जिल्ह्यात एकाच दिवशी तीन ते पाच ठिकाणी सभा घेत नेत्यांनी आपल्या भाषणात स्थानिक विकासाच्या मुद्द्यांऐवजी प्रतिस्पर्धी नेत्यांविरुद्ध आरोपांची आतषबाजी केली. काही नेत्यांनी व्यक्तिगत स्तरावर जात सुतळी बॉम्ब फोडले, तर काहींनी अगदीच फुलबाज्या उडविल्या.शरद पवार यांचे तेल लावलेले पहिलवान एकमेकांच्या विरोधात लढले व त्यांना सोडून गेले. त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही. पवार यांची अवस्था शोलेतील जेलरसारखी झाली आहे. यंदा विरोधीपक्षच शिल्लक राहिलेला नाही. कॉँग्रेसच्या गेल्यावेळेइतक्या जागाही येणार नाहीत. पवार यांच्या पक्षाचे नाव राष्टÑवादी असूनही त्यांनी राष्टÑवादाच्या निर्णयाला विरोध दर्शविला. त्यांना स्वत:ला राष्टÑवादी म्हणवून घेण्याचा अधिकार राहिलेला नाही.पाच वर्षांत आपल्या सरकारने आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक कामे केली असून, हिंमत असेल तर आघाडीने आपल्या पंधरा वर्षांतील कामाचा हिशेब द्यावा, आपण पाच वर्षांच्या कामाचा हिशेब देऊ.कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीचमग कलम ३७० सारख्या मुद्द्यांचा वापर केला जात आहे. पुलवामाच्या घटनेनंतरही हल्ला हा हवाई दलाने, सैन्याने केला. शौर्य सेनेने गाजविले, पण त्याचे श्रेय आपले पंतप्रधान घेतात. सत्ताधाऱ्यांनी कुठे श्रेयघ्यायचे, त्याचे तरी भान राखायलाहवे. प्रत्येक प्रश्नांवर ते फक्त कलम ३७० म्हणतात. रात्री झोपेतपण ३७० अशीच बडबड करत असतील का?अशी शंका येते.सुडाचे राजकारण करणे ही महाराष्टÑाची संस्कृती नाही. तुमच्या पापांचा घडा आता भरल्याने त्याची फळे भोगा. बाळासाहेबांवर गुन्हा दाखल करणे ही राष्टÑवादीची चूक होती, असे अजित पवार आता सांगतात. मग त्याच्यामागे असलेल्या नेत्याचे नाव का सांगत नाही, राज्यात युतीचेच सरकार येणार आहे कारण काँग्रेस व राष्ट्रवादी संपली आहे. एकटे शरद पवार ८० व्या वर्षी झुंज देत आहेत, हे कौतुकास्पद आहे. हा जोश जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखविला असता तर ही वेळच आली नसती.आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून गैरसमज पसरवित आहेत. आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागणार नाही.या देशात धमकीचे व दहशतीचे राजकारण सुरू झाले असून यामध्ये बदल करायचा असेल तर सत्ता परिवर्तन अपरिहार्य आहे. राहुल गांधी पुन्हा प्रचारात उतरले, ते उतरले की मोदीही उतरले. पाच वर्षांत भाजपने काय केले याची चिरफाड चालू असताना राहुल गांधी यांनी आल्या आल्या राफेलची जुनी टेप वाजवायला सुरूवात केली आहे. राफेलवर काँग्रेसला भाजपची कोंडी करायची असेल तर त्यांनी मैदानात मनमोहन सिंगांना उतरविले पाहिजे. भाजपला सत्तेवर ठेवण्याचे काम काँग्रेसच करीत आहे.सर्वच शेतकरी नेते हे प्रक्रि या उद्योगाचे मालक आहेत. त्यांच्या उद्योगाला कांदा व शेतमाल अल्पदरात उपलब्ध व्हावा यासाठी भाव पडले जात आहेत.महाराष्टÑातील बंद पडलेले उद्योग, तरुणांची बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या या प्रश्नांवर न बोलणारी भारतीय जनता पार्टी व शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात ताट-वाट्या घेऊन फिरत आहे. एक पक्ष दहा रुपयांत तर दुसरा पाच रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन देत असल्याचे पाहून महाराष्टÑ भिकेला लागलाय काय? सत्तेसाठी शिवसेना भाजपच्या पाठीमागे घरंगळत चालली असून, ही माणसे आहेत की गोट्या? कोठेही घरंगळून न जाणारा विरोधी पक्ष मला हवा आहे.मोदी सरकार आरसीईपी करारनामा करू पाहत आहे. त्यामुळे चीन, बांगलादेश, व्हिएतनाम येथून कापड आयात केले जाईल. सरकार हा करार करण्यात यशस्वी झाले तर देशाचे वस्त्रोद्योग क्षेत्र संपुष्टात येईल. कॉँग्रेस संपली असून, जगातील कुठलेही इंजेक्शन काँग्रेसला पूर्वावस्थेत आणू शकत नाही. मालेगाव शहरात स्वच्छतेअभावी क्षय रोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शहरातील विकासाकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष झालेआहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर