देवळाली कॅम्प : चारणवाडी येथे शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत छावणी परिषद व तेथील रहिवाशांमध्ये वादविवाद झाल्याने छावणी परिषदेने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे. तर रहिवाशांनीदेखील छावणी प्रशासन व पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.चारणवाडी भागात असलेल्या जिल्हा प्रशासन जागेवर गेल्या ६० वर्षांपासून राहत असलेले लक्ष्मण पवार यांनी आपले जुने घर पाडून त्या जागी नवे घर बांधायला घेतले आहे. छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथक त्या ठिकाणी पाहणी करण्यास गेले होते. याबाबत छावणी परिषदेने काही दिवसांपूर्वी देवळालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाच्या जागेवर बांधण्यात येणारे घर पाहणी करण्यास गेलेल्या अतिक्रमण पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्ष्मण पवार, गुंडाप्पा देवकर, गोपीनाथ वरपे, लालू पवार, गणेश जाधव, पप्पू शिंदे, अनिल पवार आदींनी शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी छावणी परिषदेने पत्रात केली आहे.निवेदनावर पुंडलिक जाधव, कलाबाई माने, राजेंद्र देवकर, लक्ष्मीबाई पवार, अण्णा शिंदे, शंकर पवार, गोपीनाथ वरपे, लक्ष्मण धनवटे, बाळू जाधव, सुनील जाधव, लक्ष्मण शिंदे, गंगाराम पवार आदींसह रहिवाशांच्या सह्या आहेत.पोलीस अधिकाºयांशी चर्चायाप्रकरणी चारणवाडी भागातील रहिवाशांनी मुख्याधिकारी अजय कुमार व वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील रहिवाशांनी कुठल्याही प्रकारची शिवीगाळ व दमदाटी केलेली नाही. अर्थाचा गैरअर्थ करत वडार समाजाच्या नागरिकांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी म्हणजे अतिरेक असल्याचे वडार समाजाचे नेते गुंडाप्पा देवकर यांनी सांगितले.
शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:14 PM
चारणवाडी येथे शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाबाबत छावणी परिषद व तेथील रहिवाशांमध्ये वादविवाद झाल्याने छावणी परिषदेने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले आहे. तर रहिवाशांनीदेखील छावणी प्रशासन व पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
ठळक मुद्देचारणवाडी : छावणी प्रशासनाला निवेदन