नाशिक : पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने गोदावरी व दारणा नदीला आलेल्या पुरामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला मोठा आधार मिळाला असून, एकट्या नाशिक जिल्ह्यातून गेल्या महिनाभरात १९ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहोचून ३५ टक्के जलसाठा झाला आहे.नगर व मराठवाड्यातील गावांची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर नेहमीच त्यांचा डोळा असतो. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात किती पाऊस पडला व धरणे किती भरली यावर त्यांचे लक्ष असते. विशेष करून गंगापूर व दारणा आणि पालखेड धरणातून दरवर्षी नगर व मराठवाड्यासाठी पाणी सोडले जाते. जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून तीन वर्षांपूर्वी मोठे रणकंदन माजले होते. राज्य सरकारने नाशिकवर दबाव टाकून १२ टीएमसी पाणी गंगापूर धरणातून पळविल्याने या विषयावरून राजकारणही रंगले होते. त्यानंतर सर्वत्र पाऊस चांगला झाल्याने जायकवाडीत पाणी सोडण्याची वेळ आली नाही. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात सरासरी १३० टक्के पाऊस झाल्याने जुलै महिन्यातच गंगापूर धरणात ८० टक्के जलसाठा झाला होता. त्यामुळे गोदावरीला दोन वेळा आलेल्या पुरामुळे जायकवाडीत पुरेसे पाणी पोहोचले होते. यंदाही जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यात जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी व दारणा धरणातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला. साधारणत: २० जुलैपासून गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या गंगापूर, दारणा ही दोन्ही धरणे ९० टक्क्यांच्या पुढे भरली असून, पालखेड धरणातूनही पाणी सोडले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही धरणांच्या क्षेत्रात अजूनही पाऊस कायम असल्यामुळे धरणाची सुरक्षितता लक्षात घेता सोमवारपासून गंगापूर व दारणा धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. दारणा व गोदावरीचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधाºयात पोहोचून तेथून ते पुढे नगरमार्गे जायकवाडीत जात आहे. जायकवाडी धरणाची क्षमता १०० टीमसी पाणी साठवण्याची असून, आजवर नाशिक जिल्ह्यातून धरणात १९ टीमसी पाणी पोहोचले आहे, त्याच्या आधारे जायकवाडीत सध्या ३५ टक्के साठा झाला आहे.
नाशिकच्या पाण्याने मराठवाड्याचा प्रश्न सुटला
By श्याम बागुल | Published: August 22, 2018 5:56 PM
नगर व मराठवाड्यातील गावांची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर नेहमीच त्यांचा डोळा असतो. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात किती पाऊस पडला व धरणे किती भरली यावर त्यांचे लक्ष असते. विशेष करून गंगापूर व दारणा आणि पालखेड धरणातून दरवर्षी
ठळक मुद्देजायकवाडीला १९ टीएमसी पाणी : ३५ टक्के धरण भरले२० जुलैपासून गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात