लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) अधिकारी पुढच्या आठवड्यात नाशिकमध्ये येत असून, जिल्ह्यातील कृषी, उद्योग आदी क्षेत्रासाठी इस्त्रोची काय मदत होऊ शकते या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.संसदेच्या अधिवेशनात खासदार हेमंत गोडसे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल घेत, इस्त्रोचे शिष्टमंडळ महाराष्टÑातील सात जिल्ह्यांना भेटी देणार असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. हवामानातील बदल व त्याचा पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेता, उपग्रहाच्या माध्यमातून कृषी खात्याला काही उपयोग होऊ शकतो काय शिवाय उद्योग क्षेत्रासाठी इस्त्रोचे मार्गदर्शन या निमित्ताने होणार आहे. सोमवार, दि. १४ रोजी सकाळी अकरा वाजता इस्त्रोचे शिष्टमंडळासमवेत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या खाते प्रमुखांची बैठक जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत होणार असून, दुपारनंतर शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुख पदाधिकाºयांशी शिष्टमंडळ चर्चा करणार आहे
‘इस्त्रो’चे अधिकारी नाशकात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 11:01 PM