शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

‘इस्त्रो’ देणार नाशिकच्या स्मार्ट विकासाला दिशा : पी.जी.दिवाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 10:25 PM

भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (इस्त्रो) संशोधनाचा नागरीक्षेत्राच्या विकासासाठी वापर करण्याचे ठरविले आहे.

नाशिक : भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (इस्त्रो) संशोधनाचा नागरीक्षेत्राच्या विकासासाठी वापर करण्याचे ठरविले आहे. उपग्रहांच्या आधारे वैविध्यपूर्ण वापर देशाच्या प्रगतीसाठी होत असून, नाशिकच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण विकासासाठी इस्त्रोच्या माध्यमातून तयार होणारा प्रकल्प मार्गदर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन इस्त्रोचे वैज्ञानिक सचिव डॉ. पी. जी. दिवाकर यांनी केले.‘इस्त्रो’ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन आणि विकास कार्यशाळेप्रसंगी दिवाकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अंतराळ संशोधनाचे योगदान देण्याची संधी मिळाली आहे. विविध राज्यांतील विकासासाठी नियोजनामध्ये इस्त्रोच्या संशोधनाचा वापर प्रभावी ठरला आहे. भारतीय पुरातत्व विभागासह तेलंगाना, कर्नाटक राज्यांसाठी केलेल्या कार्याचा विस्तार मोठा आहे. जिल्हास्तरावर प्रथमच इस्त्रो संशोधनाचा वापर नागरी विकासाच्या दृष्टीने करीत आहे. या विशेष प्रकल्पासाठी डॉ. सुरेश राव व डॉ. उदय राज यांच्यासह शास्त्रज्ञांचे पथक जिल्हा प्रशासनासोबत कार्यरत राहणार असल्याचे दिवाकर यांनी यावेळी सांगितले. नाशिकच्या विकासामध्ये ‘इस्त्रो’च्या उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न करत विविध संकल्पना मांडल्या. त्यांच्या संकल्पनांचा विचार नक्कीच केला जाईल, असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले. याप्रसंगी ‘भुवन’च्या भुवन -पंचायत, भुवन ३डी, भुवन डॉट एनआरएससी आदी अ‍ॅप्लिकेशन्सचे उपग्रहांद्वारे प्राप्त नकाशे, प्रतिमा आदींचे थेट सादरीकरण केले. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप , इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. उदय राज , डॉ.गिरीशकुमार , श्रीनिवासन , डॉ.यशवंत राव , डॉ. मंजुनाथन , डॉ. सुरेश राव , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उप वनसंरक्षक माणिकनंदा रामानुजम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदि उपस्थित होते.