खामखेडा : गेल्या आठ-दहा दिवसापासून प्रचंड प्रमाणात ऊन पडत असल्याने नागरिक या आॅक्टोबर हिटने त्रस्त झाला आहे.दर वर्षी आॅक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस भरपूर प्रमाणात पडत असल्याने जमिनीत गारवा निर्माण होत होता. यामुळे आॅक्टोबर महिन्यातील ऊन फारसे जाणवत नव्हते.परंतु चालू वर्षी सुरवातीला फारसा पाऊस झाला नाही. यामुळे जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरले नसल्याने जमिनीत ओलावा तयार झाला नाही.तसेच या वर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने जमिनीत गारवा तयार न झाल्याने वातावरणात प्रचंड प्रमाणात उष्णता तयार होत आहे.सद्या खरीप हंगामातील बाजरी व मका बाजरीचा कापणीचा हंगाम सुरू झाला आहे.परंतु या आॅक्टोबर हिटमुळे शेतमुजरी हेरण झाले आहेत.तेव्हा पिकाची कापणी करतांना दहा वाजेपासून प्रचंड प्रमाणात ऊन लागत असल्याने काम करण्याची इच्छा होत नाही.तेव्हा हे शेतमजूर सकाळी लवकर कामावर जाऊन अकरा बारा वाजेपर्यत शेतात शेतीचे कामे करतात.दुपारी शेतातील झाडाखाली आराम करतात.आ िणपुन्हा चार वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यत कामे करतात.तसेच शेतातील पिकांना रात्री किंवा सकाळी पाणी भरले कि या ऊनामुळे दुपारी जमीन कोरडी दिसते.त्यामुळे पिकांना पाणी देणे आवघड झाले आहे.त्यामुळे पिकांना ताण पडत आहे. दुपारच्या वेळीरस्त्यावर फारशी वर्दळ दिसत नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेस रस्ते ओस दिसतात.या ओक्टॉबर हिटमुळे विविध आजाराच्या रु ग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे.
कडक उन्हामुळे पिकांना पाणी देणे आवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 4:42 PM
खामखेडा : गेल्या आठ-दहा दिवसापासून प्रचंड प्रमाणात ऊन पडत असल्याने नागरिक या आॅक्टोबर हिटने त्रस्त झाला आहे.
ठळक मुद्देया वर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने जमिनीत गारवा तयार न झाल्याने वातावरणात प्रचंड प्रमाणात उष्णता तयार होत आहे.