अभोणा : उत्तर भारतात होणारी बर्फवृष्टी आणि दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरातील निवार चक्रीवादळाचा परिणाम तालुक्यातील हवामानावर झाला असून, शहर परिसरासह तालुक्यात ढगाळ वातावरणाबरोबरच थंडगार वारे वाहत असून, थंडीत एकदम वाढ झाल्याने अभोणकर गारठले. थंडीतील वाढ रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. सध्या परिसरात गहू, हरभरा,
ज्वारी आदी पिकांच्या पेरणीबरोबरच काही ठिकाणी उन्हाळ कांदा लावणीची लगबग सुरू आहे. दरम्यान, शेती वीजपंपासाठी देण्यात येणारा वीजपुरवठा सलग आठवडाभर दिवसा देण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.