नाशिक : मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयाने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांनी उत्तुंग यश मिळवले आहे. विज्ञान शाखेचा ९८.४४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.१७ टक्के, तर कलाशाखेचा ६३.२६ टक्के आणि संयुक्त शाखेचा ७२.६४ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत मैथिली चिखले ८५.२३ टक्के, वाणिज्यमध्ये रुचिरा घोडके ९२.७७ टक्के, विज्ञान शाखेत कार्तिक खांडरे ९३.५४ टक्के तर संयुक्त शाखेत पूजा पाटील हिने ७९.८४ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोनाना आहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एस. के. शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.आरंभ महाविद्यालयाचा ८३ टक्के निकालनाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील आरंभ महाविद्यालयाचा कला, वाणिज्य, विज्ञान व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांचा इयत्ता १२ वी परीक्षेचा सरासरी निकाल ८३ टक्के लागला. वाणिज्य शाखेत प्रीती गायखे ८५. ८५ टक्के, वैष्णवी एखंडे ८५.७० टक्के, प्रज्ञा मानकर ८५.२३ टक्के तर विज्ञान शाखेत संकेत रहाडे, सय्यद सिरीन जाकिरहुसेन ८०.४६ टक्के, ओमकार पेखळे ७७.२३ टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाकाचे यश मिळवले. कला शाखेचा निकाल ६२. ५१ टक्के लागला आहे.जी. डी. सावंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यशजी. डी. सावंत महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८५.९३ टक्के तर कला शाखेचा ६५.९२ टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेत अमिशा काकड, वैष्णवी रसाळ, दिव्यांगी वाघ तर वाणिज्य शाखेत गायत्री शिंदे, निखिल देसाई, रितेश कुलकर्णी तर कला शाखेत हर्षदा वाघ, आदेश शिरसाठ आणि आकांक्षा तांगडकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश मिळवले.
भरघोस निकालाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:05 AM