एक्सपर्ट व्ह्यू
अविनाश शिरोडे ।भारताचा चांद्रयान-२ हा कार्यक्र म याची संकल्पनेपासून तर जोडणी आणि लॉन्चिंगची वेळ येईपर्यंतचा बराचसा काळ हा या कार्यक्र मात व्यतित झालेला आहे. त्याचं उलटी मोजणी वीस तास आधी सुरू झाली होती आणि त्याप्रमाणे सगळं काही सुरळीत आहे असे वाटत होतं. परंतु ऐनवेळी अचानक दोष लक्षात आला आणि भारताने मोहीम थांबविली. हे योग्यच झाले. अशाप्रकारचे तांत्रिक दोष वेळीच लक्षात आल्याने मोहीम अपयशी होण्याऐवजी थांबविली गेली आणि भारताच्या यशाला गालबोट लागले नाही हे योग्य ठरले.हे चांद्रयानसाठी आपण जे रॉकेट वापरतो आहे ते आहे जीएसएलव्ही मार्क थ्री. ज्याला भारताचं बाहुबली रॉकेट म्हणता येईल. त्याने चार हजार किलोपर्यंतचे वजन अवकाशात पाठवता येऊ शकते. हे तीन स्टेज रॉकेट आहे.ज्याला दोन बुस्टर्स जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये लिक्विड इंधन भरलेलं असतं. तसं पहिल्या स्टेजला सॉलिड दुसऱ्या स्टेजला लिक्विड आणि तिसºया स्टेजला क्र ायोजनिक इंजिन आहे. ज्याच्यामध्ये हायड्रोजन नायट्रोजन वापरल्या जातात. आता रॉकेट हे लॉन्चिंगच्या ठिकाणी आणल्यानंतर त्याच्या कॉम्प्युटर तसेच मानवी अशा सगळ्या रिहर्सल घेतल्या जातात. त्याच्या सगळ्या टेस्ट घेतल्या जातात. परंतु ऐनवेळी सुदैवाने त्या क्र ायोजेनिक इंजिनमध्ये एक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे लक्षात आले ही अतिशय सुदैवाची गोष्ट आहे. कारण या क्र ायोजेनिक इंजिनने आपले चांद्रयान आधी आॅर्बिटमध्ये आणि नंतर चंद्राभोवती जाऊन चंद्रावर आपल्या विक्र म लँडर व प्रज्ञान रोव्हर उतरवणार होते. या सबंध कार्यक्रमांमध्ये क्र ायोजनिक स्टेजची अत्यंत महत्त्वाची कामगिरी होती. आपण सुदैवी म्हटले पाहिजे की, ऐन वेळी ही तांत्रिक अडचण लक्षात आली. अन्यथा हे संबंध मिशन हे अयशस्वी ठरलं असतं आणि त्याचा फार मोठा फटका आपल्या शास्त्रज्ञांवर आणि आपल्या क्षमतेवर झाला असता. कारण आज जगातल्या जेवढ्या स्पेस एजन्सीज आहेत त्यांचा सक्सेस रेट जो आहे त्यापेक्षा भारताच्या इस्रोच्या सक्सेस रेट हा खूपच जास्त आहे. त्यामुळे कोणीही अशा वेळी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही आणि घेता येत नाही. म्हणून सुदैवाने ५६ मिनिटे आणि २४ सेकंद आधी हे उलटी गिनती थांबविण्यात आली. आता याच्यादुरुस्ती व सुधारणेसाठी आणखी साधारण दहा ते बारा दिवस जातील. उतरविण्यात येईल त्यातील इंधन पूर्ण रिकामे करावे लागेल आणि त्याची ही तांत्रिक अडचण आहे ती सुधारावी लागेल आणि नंतर पुन्हा हे यान प्रक्षेपणासाठी तयार होईल. आपला हा कार्यक्र म शंभर टक्के यशस्वी होईल यात कुठलीही शंका नाही.(लेखक नॅशनल स्पेस सोसायटी, यूएसएच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष आणि स्पेस अॅम्बेसेडर आहेत.)उपक्रम पूर्णत्वास जाईलचांद्रयान-२ ऐनवेळी थांबविण्यात आला असला तरी त्यात कुठलाही मानवी घिसाडघाई किंवा अकार्यक्षमता मुळीच नाही. या गोष्टी होतच असतात. कारण याच्यात लाखो काम्पोनंट््स असतात आणि लाखो कनेक्शन्स असतात. त्यामुळे त्याच्यात यशस्वीता एक तर शून्य किंवा शंभर टक्के असेच असते. आपला हा कार्यक्र म अतिशय योग्य पद्धतीने थोड्याच दिवसात पूर्णत्वास जाईल याची पूर्ण खात्री आहे.