शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

सावजानेच केला बिबट्याचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:22 PM

सिन्नर : आदल्या दिवशी मध्यरात्री ठार केलेली शेळी खाण्याचा मोह न आवरल्याने पुन्हा दुसºया दिवशी परत आलेला बिबट्या मृत सावजामुळेच पिंजºयात जेरबंद झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातल्या वडांगळी शिवारात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. आदल्या दिवशी बिबट्याने मारलेली शेळी पिंजºयात ठेवण्याची वनविभाग व शेतकºयांची क्लृप्ती यशस्वी ठरल्याने बिबट्या अलगद पिंजºयात अडकला.

ठळक मुद्देक्लृप्ती यशस्वी : मारलेली शेळी खाण्यासाठी पुन्हा आलेला बिबट्या अडकला पिंजºयात

 सिन्नर तालुक्यात वडांगळी शिवारात चव्हाणके वस्तीवर पिंजºयात जेरबंद करण्यात आलेला बिबट्या.

शैलेश कर्पे ।सिन्नर : आदल्या दिवशी मध्यरात्री ठार केलेली शेळी खाण्याचा मोह न आवरल्याने पुन्हा दुसºया दिवशी परत आलेला बिबट्या मृत सावजामुळेच पिंजºयात जेरबंद झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातल्या वडांगळी शिवारात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. आदल्या दिवशी बिबट्याने मारलेली शेळी पिंजºयात ठेवण्याची वनविभाग व शेतकºयांची क्लृप्ती यशस्वी ठरल्याने बिबट्या अलगद पिंजºयात अडकला.त्याचे झाले असे.. मंगळवारी रात्री बिबट्याने वडांगळी शिवारात निमगाव रस्त्याजवळ व कडवा कालव्यालगत राहणाºया रावसाहेब जगन्नाथ चव्हाणके यांच्या पोल्ट्री शेडमध्ये बांधलेल्या शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाणके यांची शेळी ठार झाली. मात्र याचवेळी वस्तीवर राहणाºया चव्हाणके यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने मारलेली सावज टाकून पळ काढला.चव्हाणके कुटुंबीयांनी रात्रभर जागरण करून गोठ्यात बांधलेल्या गायींचे संरक्षण करीत रात्र डोक्यावर घेतली. बुधवारी सकाळीच सिन्नरच्या वनविभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर जवळच असणाºया मक्याच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला.दिवसभर पिंजरा लावल्यानंतर बुधवारी सायंकाळी चव्हाणके दामपत्य गायींचे दूध काढण्यासाठी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोठ्याजवळ गेले. दूध काढत असतांनाच गोठ्याच्या भिंतीवरुन मांजराने संगीता चव्हाणके यांच्या अंगावर उडी घेतली. मांजर फार घाबरलेले असल्याने चव्हाणके यांनी गोठ्याबाहेर डोकावल्यानंतर बाहेर दोन बिबटे मांजराच्या पाठीमागे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. वनविभागाला संपर्क साधून दोन बिबटे पुन्हा वस्तीवर आल्याचे सांगितले. वनविभागाच्या परवानगीने चव्हाणके कुटुंबीयांनी मक्याजवळ लावलेला पिंजरा पोल्ट्री शेडजवळ आणला व त्यात आदल्या रात्री मारलेली शेळी सावज म्हणून बिबट्याला ठेवली. रात्री दहा वाजेच्या सुमारास भुकेलेले बिबटे पुन्हा चव्हाणके यांच्या वस्तीवर चाल करून आले. त्यांना पिंजºयात आदल्या दिवशी शिकार केलेली शेळी दिसली. भुकेलेल्या बिबट्यांना मोह न आवल्याने ते पिंजºयात शिरले. तेवढ्यात पिंजºयाचा दरवाजा खाली पडला आणि नर बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला. तर दुसºया मादी बिबट्याने धूम ठोकली.शेतकरी व दोन बिबट्यात रंगला थरारऽऽआदल्या रात्री शेळीला ठार केल्याने भुकेला बिबट्या पुन्हा बुधवारी चव्हाणके यांच्या वस्तीवर चकरा मारत होता. आदल्या रात्री एकच बिबट्या आला होता. मात्र बुधवारी सायंकाळपासून चव्हाणके यांच्या वस्तीवर दोन बिबटे येऊ लागल्याने दहशत निर्माण झाली होती. चव्हाणके बिबट्यांना हुसकावून लावण्यासाठी फटाके फोडत होते. रात्री दहाच्या सुमारास एक बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला. सुमारे तीन तास शेतकरी व बिबट्यात थरार रंगल्याचे दिसून आले. डरकाळ्यांनी दुमदुमला परिसरवडांगळी शिवारात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नर बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला तर दुसरा बिबट्या पिंजºयाबाहेर होता. दोन्ही बिबट्यांनी डरकाळ्या फोडण्यास प्रारंभ केल्याने परिसर दुमदुमून गेला होता. बिबट्याच्या गुरगुरण्याच्या आवाजाने परिसरात दहशत निर्माण झाली होती.