नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर बहुतांशी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना अंतिम निर्णय निर्गमित होण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतर नगरसेवकांच्या पक्षांतराला पुन्हा सुरुवात होणे शक्य आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रभाग जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने धावपळ सुरू होणार आहे.पुढील वर्षी साधारणत: फेबु्रवारी महिन्यात नाशिकसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर चार सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात येण्याची अटकळ बांधली जात आहे. सत्तारूढ भाजपाने आपल्या सोयीने हा निर्णय घेतला असून, जो पक्ष संपूर्ण शहरभर पसरला असेल त्यांनाच या पद्धतीचा लाभ होणार आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांची मात्र मोठी अडचण होणार आहे. यापूर्वीच्या आघाडी सरकारने एक सदस्यीय प्रभाग रचना करण्याचे आदेश सत्तेवरून पायऊतार होण्यापूर्वी दिले होते मात्र सत्तातरानंतर नव्या सरकारने पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता चार सदस्य प्रभाग पद्धतीचा निर्णय झाला असून, राजपत्रात प्रसिद्धीसाठी देण्यात आल्याची राजकीय पातळीवर चर्चा आहे. चार सदस्यीय प्रभाग घोषित झाला तर आत्ताच अनेक पक्षांच्या नगरसेवकांची पळापळ सुरू होणार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत सध्याच्या प्रभागाच्या दुप्पट क्षेत्र असणार आहे.
अवागमनाला पुन्हा होणार सुरुवात
By admin | Published: May 29, 2016 10:47 PM