याच वन विभागाच्या वसाहतीत मागे एक वर्षापूर्वी एक वन कर्मचारी स्थायिक राहत होते. राजापूर येथे वन विभागाचे वनपाल व इतर कर्मचाऱ्यांसाठी खोल्या उपलब्ध असताना एकही कर्मचारी या ठिकाणी राहत नाही. मात्र, वन विभागाच्या वनपाल कार्यालयात पर्यटकांसाठी आणलेल्या नवीन सायकली, बॅनर व स्ट्रीट लाइटचे पोल या कार्यालयात कित्येक दिवसांपासून धूळखात पडलेले आहे. या वस्तूंवर लाखो रुपये वन विभागाने खर्च करून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध केलेले हे साहित्य धूळखात पडून आहे. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या वस्तू कार्यालयात कित्येक दिवसापासून पडून आहे. वन विभागाचे वन कर्मचारी हे बाहेरगावी राहून वन विभागाचा कारभार पाहत आहेत. राजापूर ममदापूर वनसंवर्धन व वन विभागाच्या जंगलात कर्मचारी कधी येतात- कधी जातात, हे कोणालाच समजत नाही. वन विभागाची वसाहत असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती झाली आहे.
राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रात अनेक विकासकामांसाठी लाखो रुपये निधी येत असून विकास कामे कुठे झाली आहे, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. राजापूर येथे वडपाटी पाझर तलावाजवळ रोपवाटिका असून वन विभागात प्रत्यक्ष वन मजूर किती कामे करतात हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. राजापूर, ममदापूर, परिसरात हरिण, काळवीट मोठ्या प्रमाणावर आहेत. राजापूर येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वसाहतीत राहावे, असा ठराव सर्वानुमते ग्रामपंचायतीमध्ये घेतलेला आहे. या वसाहतीमध्ये कायम कर्मचारी राहण्यासाठी यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोट....
येवला तालुक्याच्या पूर्व भागात वन विभागाचे राजापूर ममदापूर वन संवर्धन क्षेत्रामध्ये आतापर्यंत बरीच विकास कामे झाली आहेत; पण वन वसाहत जाणून बुजून ओस पाडली जाते आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. विकास कामांची ही चौकशी करण्यात यावी. राजापूर वसाहतीत कर्मचारी राहत नाही म्हणजे अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक दिसत नाही.
- सुभाष वाघ, उपसरपंच, राजापूर.
फोटो- १२ राजापूर वनविभाग/१
120921\12nsk_5_12092021_13.jpg~120921\12nsk_6_12092021_13.jpg
फोटो- १२ राजापूर वनविभाग/१~फोटो- १२ राजापूर वनविभाग/१