नाशिक : नाशिककरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी राष्टÑीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचा अधिकाधिक वापर करण्याच्या हेतूने या पुलावर वाहने चढण्यासाठी व उतरण्यासाठी खास ‘एंट्री’ व ‘इक्झिट’ असे दोन पॉइंट तयार करण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. येत्या दोन महिन्यांत सिडको सातपूरकरांना पुलावर आपली वाहने चढविता येतील, तर इंदिरानगर, पेठेनगरच्या रहिवाशांना उड्डाणपुलावरून खाली उतरणेही सोपे होणार आहे. नाशिक शहरातून जाणाºया मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीचा विचार करता गरवारे पॉइंट ते के. के. वाघ दरम्यान एक सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल व पाथर्डी फाटा, स्टेट बॅँक चौक, राणेनगर, इंदिरानगर या ठिकाणी ओव्हर ब्रीज करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकडून येणाºया वाहनाला थेट धुळ्याकडे या मार्गाचा वापर करून प्रवास करता यावा असा त्यामागचा हेतू असून, के. के. वाघ महाविद्यालयापासून थेट गरवारे टी. पॉइंटपर्यंत धुळ्याकडून मुंबईकडे जाणाºया वाहनांनाही विनासायास प्रवास करणे त्यामुळे सोपे झाले असले तरी, या राष्ट्रीय महामार्गाचा नाशिक शहरातील वाहनचालकांना फारसा उपयोग होत नसल्याचे कालांतराने लक्षात आल्यामुळे त्यावरील उपाययोजना शोधण्याचे काम सुरू होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या मार्गाची अनेकवार पाहणी केल्यानंतर त्यातील काही त्रुटी लक्षात आल्यावर त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.असे उतरता येईल पुलावरूनमहामार्गाचा वापर करणाºया नाशिककरांना धुळ्याकडून येताना द्वारका चौकातच आपली वाहने पुलावरून खाली उतरवून घेतली जात होती. त्यामुळे द्वारकापासून ते थेट सिडको, पेठेनगर, इंदिरानगरपर्यंत या वाहनांना समांतर रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. आता मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्प्लेंडर हॉलजवळ महामार्गावरून खाली उतरण्याची सोय केली आहे. याठिकाणी उतरलेल्या सिडकोतील वाहनांना पुढे लेखानगर चौकातून सिडकोत जाणे सोपे होणार आहे, तर इंदिरानगर, पेठेनगर, राणेनगर येथे जाणाºया वाहनांनादेखील स्प्लेंडर हॉलपर्यंत महामार्गाचा वापर करून खाली उतरण्याची सोय होणार आहे.असा होईल महामार्गावर प्रवेशराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वीच नाशिककरांची अडचण लक्षात घेऊन अंबड औद्योगिक वसाहतीतील गॅबरियल कंपनीच्या पाठीमागे राष्टÑीय महामार्गाला पंक्चर दिला आहे. त्यामुळे सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतून धुळ्याकडे जाणाºया अवजड वाहनांना थेट महामार्गावर प्रवेश देण्यात आला. त्यामुळे या वाहनांनी नाशिक शहरातील समांतर रस्त्याचा वापर टाळण्यास मदत झाली. आता नवीन उपाययोजनांनुसार सिडकोतील स्टेट बॅँक चौकातही महामार्गाला पंक्चर देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सिडको व सातपूरच्या नागरिकांना स्टेट बॅँक चौकातूनच महामार्गावर प्रवेश मिळणे सोपे होणार आहे. पूर्वी या भागातील वाहनचालकांना थेट द्वारकापर्यंत जाऊन पुढे उड्डाणपुलावर प्रवेश करता येत होता.वाहतूक कोंडीत भरचौपदरीकरण झालेल्या मुंबई-आग्रा महामार्गाचा वापर करणाºया नाशिककरांना धुळ्याकडून येताना द्वारका चौकातच पुलाच्या खाली उतरावे लागते त्यामुळे अगोदरच वाहतुकीच्या गर्तेत सापडलेल्या द्वारका चौकात वाहनांची कोंडी होण्याची भर पडते. असाच प्रकार मुंबईकडून येणाºया वाहनांना एकतर गरवारे टी. पॉइंट येथे समांतर रस्त्यावर उतरावे लागते किंवा थेट इंदिरानगर बोगद्याजवळ वाहने खाली आणावी लागतात. परिणामी इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतुकीची कोंडी नित्याचीच ठरलेली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही नाशिककरांना मात्र ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला कायम सामोरे जावे लागते.मुंबईकडे जाणे सोपे होईलमुंबईकडे जाणाºया वाहनांना महामार्गावर चढण्यासाठी द्वारका चौक व इंदिरानगर चौफुली असे दोनच पर्याय शिल्लक होते. त्यामुळे पेठेनगर, राणेनगर, तसेच सिडकोतील वाहनांना इंदिरानगर येथून महामार्गावर चढावे लागत होते अन्यथा थेट गरवारे टी. पॉइंटपर्यंत समांतर रस्त्याचा वापर करून महामार्ग गाठावा लागत होता. आता मात्र राणेनगरच्या पुढे हॉटेल सेव्हन हेवन येथे महामार्गाला पंक्चर देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी धुळ्याकडून येणाºया वाहनाला समांतर रस्त्यावर उतरण्याची जशी सोय होईल त्याचप्रमाणे पेठेनगर, राणेनगर, जुन्या सिडकोतील वाहनांना सेव्हन हेवन हॉटेलच्या समांतर रस्त्यावरून थेट महामार्गावरून मुंबईकडे जाण्यासाठी प्रवेश करता येणार आहे.
महामार्गावर चढणे, उतरणे होणार सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:33 PM