संगमेश्वर : वैद्यकीय उपचार पद्धतीमधील एक जुनी उपचार पद्धती युनानीचे संस्थापक पैगंबरवासी मसिहुल मुलक हकीम अजमल खानसाहेब यांच्या जन्मदिनी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी राष्टÑीय युनानी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला आहे. दरवर्षी वैद्यकीय उपचार पद्धतीमधील आयुर्वेद, होमिओपॅथी, योग व प्राकृतिक चिकित्सा यांचे वार्षिकदिन भारतभर साजरे केले जातात. त्याच धर्तीवर युनानी दिवस साजरा करण्यासंबंधी गेल्या अनेक वर्षापासून मागणी करण्यात आली होती. त्यावर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मागणीची दखल घेऊन ११ फेब्रुवारी हा दरवर्षी युनानी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्टÑ शासनाच्या आयुष संचालनालयाने सुद्धा महाराष्टÑातील युनानी वैद्यकीय महाविद्यालयांना यानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्याचे पत्र पाठविले आहे. संपूर्ण महाराष्टÑात मालेगाव प्रमाणेच वर्सोवा, पुणे, जळगाव, अक्कलकुवा, औरंगाबाद या सहा ठिकाणी युनानी वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत आहेत. राष्टÑीय युनानी दिवसानिमित्त येथील मोहंमदीया तिब्बिया युनानी महाविद्यालयात तीन दिवशीय विविध कार्यक्रम होतील. यात विद्यार्थ्यांसाठी वादविवाद, निबंध स्पर्धांसह मालेगाव तालुक्यातील पाटणे, कौळाणे, चंदनपुरी येथे आरोग्य जनजागृती शिबिर व मालेगावच्या महाविद्यालय रुग्णालयात मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ फेब्रुवारीला विशेष स्वागत सोहळ्याने पहिला राष्टÑीय युनानी दिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती मालेगाव युनानी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती डॉ. शाहेदा रेहमानी व तिब्बिया संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. इस्माईल रोशनअली यांनी दिली.
११ ला राष्टÑीय युनानी दिवस साजरा करणार ाालेगाव : केंद्रीय आयुष मंत्रालयाचा निर्णय; विविध कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:55 PM
संगमेश्वर : वैद्यकीय उपचार पद्धतीमधील एक जुनी उपचार पद्धती युनानीचे संस्थापक पैगंबरवासी मसिहुल मुलक हकीम अजमल खानसाहेब यांच्या जन्मदिनी म्हणजेच ११ फेब्रुवारी रोजी राष्टÑीय युनानी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला आहे.
ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षापासून मागणी वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत