मनमाड : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. मनमाड येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजीत एल्गार महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.राज्यातील धनगर समाज अनुसूचित जमातीला मिळणाºया आरक्षणाच्या सवलतींपासून वंचित असून, या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनमाड येथे उत्तर महाराष्टÑातील समाजबांधवांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अक्षदा माने, चैत्राली मार्कंड, साक्षी देवकाते या विद्यार्थींनींनी मनोगतातून मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. सभास्थानाच्या मार्गावर सर्वत्र पिवळे झेंडे व पताका लावण्यात आल्या होत्या. कालेलकर आयोगाच्या शिफारशीनुसार अनुसूचित जमातीच्या ३६ व्या क्रमाकांवर धनगर समाजाचाउल्लेख केला आहे. परंतु इंग्रजी उच्चारानुसार धनगरऐवजी धनगड असा उल्लेख केला गेला आणि आजही तो तसाच आहे. ज्यांच्या नावाने धनगरांचे आरक्षण दिले गेले नाही ते धनगड राज्यातच काय देशात कुठे अस्तित्वात नसल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विजय हाके, राजाभाऊ खेमनार, राजेंद्र शेळके, गंगाधर बिडगर, साईनाथ गिडगे, मच्छिंद्र बिडगर, यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मच्छिंद्र बिडगर यांनी केले.मंत्रालयावर मोर्चासरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रालय पेटवण्याची वाट पाहाताय की काय, असा परखड सवाल उत्तमराव जानकर यांनी सरकारला विचारला. धनगर आरक्षणावर एकही आमदार विधानसभेत तोंड उघडत नाही. धनगर समाजात सरकारचा पराभव करण्याची ताकद असून, येणाºया निवडणुकीत हे सरकार गाडून टाका, असे अवाहन जानकर यांनी समाजबांधवांना केले.गोपीचंद पडाळकर यांनी भाषणातून सरकारवर टीकेची झोड उठवली. आजपर्यंत प्रत्येक सरकारने धनगर समाजाचा फक्तवापर करून घेतला आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी जानेवारीत महाड येथील चवदार तळ्यापासून मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आरक्षणाचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याने त्यांनी लक्ष घालून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. समाज बांधवांना आरक्षण देण्याबरोबरच योग्य प्रमाणात सत्तेतसुद्धा वाटा मिळाला पाहिजे यासाठी युवावर्गाने राजकारणात या असे अवाहन पडळकर यांनी केले.
एल्गार मेळाव्यात आरक्षणाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 6:23 PM
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह कुठल्याच पक्षाचा विरोध नाही मग आरक्षण देण्याला अडचण काय? आम्हाला आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. मात्र आरक्षणाच्या लढाईत आड येणाºया सरकारला हद्दपार केल्याशिवाय समाजबांधव स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा समाजाचे ज्येष्ठ नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. मनमाड येथे धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजीत एल्गार महामेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ठळक मुद्देमनमाड : धनगर समाज कृती समाजातर्फे महामेळावा