त्र्यंबकेश्वर : येथील श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आश्रमात श्री जगदंबा त्रिगुणात्मिका शतचंडी महायज्ञ संपन्न झाला.पौर्णिमा गुरुपुष्यामृत योगाच्या पार्श्वभूमीवर सदर यज्ञविधी पार पडला. या यज्ञासाठी श्री तपोनिधी पंचायती निरंजनी आखाड्याचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, श्री महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा श्रीमहंत गणेशानंद सरस्वती, श्री महंत सर्वानंद सरस्वती, श्री महंत नाथानंद सरस्वती, श्री महंत सिध्देश्वरानंद सरस्वती आदी उपस्थित होते. पूजेचे पौराहित्य वेदमूर्ती डॉ. पंकजशास्त्री घेवारे व त्यांचे सहकारी ब्रम्हवृंदाच्या उपस्थितीत पार पडला.देश कोरोनामुक्त व्हावा, या सद्हेतूने या यज्ञाचे आयोजन केले असल्याचे पुरोहित डॉ. घेवारे यांनी सांगितले. यावेळी गुरुवर्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांचे शिष्यत्व विक्रम नागरे यांनी घेतले तर गुरुदक्षिणा म्हणून आश्रमास एक काळी कपिला गाय दान म्हणून देण्यात आली. तर गौशाळेसाठी जागा देण्याचा संकल्प ही सोडण्यात आला. शतचंडी पूजा यज्ञविधी संपन्न झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या यज्ञप्रसंगी नगरसेविका इंदुबाई नागरे, त्यांचे पुत्र विक्रम नागरे, आरती नागरे, आप्तेष्ट, संत, महंत, साधु आदींसह नागरिक उपस्थित होते.
श्री स्वामी सागरानंद आश्रमात जगदंबा शतचंडी महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2021 6:31 PM
त्र्यंबकेश्वर : येथील श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या आश्रमात श्री जगदंबा त्रिगुणात्मिका शतचंडी महायज्ञ संपन्न झाला.
ठळक मुद्देदेश कोरोनामुक्त व्हावा, या सद्हेतूने या यज्ञाचे आयोजन