ठळक मुद्दे सोमवार, दि. २४ व मंगळवार, दि.२५ रोजी वजनी गटात कुस्त्यांची दंगल होणार आहे. दि. २४ रोजी मालती इनामदार लोकनाट्य, तर दि. २५ तारखेला भिका-भीमा लोकनाट्य तमाशा यात्रेत रंग भरणार आहे.
देवगाव : देवगाव पंचक्र ोशिचे कुलदैवत असलेल्या आईभवानी जगदंबामाता यात्रेला मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रारंभ होत असून, यात्रा उत्सवास रविवार, दि.२३ पासून प्रारंभ करण्यात आला. यात्रा सलग तीन दिवस भरणार आहे. यानिमित्त जगदंबा मातेची ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक मारु ती मंदिर, ताईबाई मंदिरमार्गे, ग्रामपंचायत कार्यालयासमोरून जगदंबा मंदिर येथे समारोप करण्यात आला.यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटी सदस्य तुकाराम बोचरे, नामदेव बोचरे, विश्वनाथ निलख, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाने, रवींद्र बोचरे, विनायक बोचरे, गोपीनाथ मेमाने, जावेद शेख, संतोष बोचरे, योेगेश बोचरे, उमरफारु क काद्री, दत्तात्रय बोचरे, सतीश बोचरे, अनिल कापसे, संपत अढांगळे यांनी केले आहे.