नाशिक-
फटाक्यांची आतषबाजी आणि जय भीमच्या जयघोषात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा जल्लोष नाशिक शहरात मध्यरात्रीपासूनच सुरू झाला आहे.नाशिक शहरातील सर्व चौकात आकर्षक सजावटी करून डॉ आंबडेकर यांचे पुतळे उभारण्यात आले असून रात्री ठीक 12 वाजेच्या ठोक्यावर जय भीमाचा नारा देत ठीक ठिकाणी अभिवादन करण्यात आले. नाशिक शहरातील सर्वात महत्वाच्या सीबीएस चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार वसंत गीते,माजी महापौर विनायक पांडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पूलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, माजी नगरसेवक सुरेश दलोड, गणेश उन्हवणे, संजय खैरनार, आनंद सोनवणे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष अर्जुन पगारे, दिपचंद दोंदे, धनंजय निकाळे,दीपक डोके, बाळासाहेब शिंदे, शशी हिरवे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.