नाशिकरोड : धर्मदाय आयुक्त महाराष्टÑ राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी दोनदिवसीय आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये सुमारे १८५० कैद्यांची तपासणी करण्यात आली.धर्मदाय आयुक्त महाराष्टÑ राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, तुलसी आय हॉस्पिटल, श्री गुरुजी रुग्णालय, के.बी.एच. डेंटल हॉस्पिटल, एसएमबीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दोन दिवस कैद्यांची त्वचारोग, नेत्ररोग, दंतरोग व मनोविकार तपासणी करून उपचार करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मदाय सह-आयुक्त प्रदीप घुगे, सहायक धर्मदाय आयुक्त आर.ए. लिप्टे, के. एम. सोनवणे, धर्मदाय निरीक्षक हर्षवर्धन शिरूडे, कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुमावत, डॉ. ससाणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक कारकर, अतिरिक्त वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसाच्या शिबिरामध्ये १७६० पुरुष व ९० महिला अशा एकूण १८५० कैद्यांची तपासणी केली. मनोविकाराने ग्रस्त असलेल्या एकूण ८३ कैद्यांवर उपचार करण्यात आले.यावेळी तुरुंगाधिकारी डी. बी. पाटील, पी. आर. पाटील, बी. एन. मुलाणी, पी. डी. बाबर, एस. पी. सरपाते, पी. व्ही. विभांडिक, सी.के. जठार, जनरल सुभेदार वसंत सुपारे, शशिकांत दिवे आदींंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कारागृहातील कैद्यांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 1:04 AM