नाशिक : उसनवार पैशातून तिघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना जेलरोडवरील छत्रपतीनगरमध्ये घडली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर विसपुते (रा़ दसकगाव, जेलरोड) यांच्याकडून संशयित निकशा निकम याने पाचशे रुपये उसने घेतले होते़८ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उसनवार पैसे परत करण्याच्या कारणावरून कुरापत काढून संशयित निकशा निकम, समाधान निकम व सुभाष निकम यांनी शिवीगाळकरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़यामध्ये विसपुते यांच्यापायास व छातीस दुखापत झाली असून, संशयितांनी या ठिकाणी कसा राहतो असे म्हणूनदमदाटी केली़ याप्रकरणीउपनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उसनवार पैशातून जेलरोडला एकास जबर मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:02 AM