शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

जेलरोडला २६ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:21 AM

राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा २६ लाखांचा गुटका गुजरातवरून आयशर ट्रकमधून पुण्याला जात असताना उपनगर पोलिसांनी जेलरोड नारायणबापूनगर चौकात पकडला. यावेळी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला.

नाशिकरोड : राज्यात बंदी असलेला विविध प्रकारचा २६ लाखांचा गुटका गुजरातवरून आयशर ट्रकमधून पुण्याला जात असताना उपनगर पोलिसांनी जेलरोड नारायणबापूनगर चौकात पकडला. यावेळी ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला.  राज्यात विक्री व खाण्यास बंदी असलेला विविध प्रकारचा गुटखा गुजरातवरून नाशिकरोड जेलरोडमार्गे पुण्याला जात असल्याची गोपनीय माहिती उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना मिळाली. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास रायते यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड नारायणबापूनगर चौकात पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव, सतीश जगदाळे, हवालदार सुनील कोकाटे, प्रजित ठाकूर, अण्णा कुंवर, राहुल खांडबहाले, दीपक पवार यांनी सापळा रचला. यावेळी आगरटाकळी कडून येणारा आयशर ट्रक (जीजे २७ व्ही ९२९१) सापळा रचलेल्या पोलिसांनी थांबविण्यास सांगताच ट्रकचालकाने अगोदरच ट्रक उभा करून धूम ठोकली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारच्या गुटख्याचे पोते दिसून आले. अन्न व औषध प्रशासन विभागाला पोलिसांनी कळविल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, प्रमोद पाटील, किशोर बाविस्कर, गुलाबसिंग वसावे हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. ट्रकमध्ये सुगंधित तंबाखूच्या एकूण ६८ गोण्या मिळून आल्या. राज्यात विक्रीसाठी बंदी असलेला २५ लाख ९३ हजारांचा गुटका व आयशर ट्रक जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरला उपनगर नाक्यावर उपनगर पोलिसांनी ४१ लाख ६५ हजारांचा गुटका जप्त केला होता.नाशिकमार्गे जातो गुटखाराज्यात विक्री व खाण्यासाठी बंदी असलेला गुटखा पुणे, नगर व इतर भागात पाठविण्यासाठी गुजरातवरून नाशिकमार्गे जात असल्याचे उघड झाले आहे. ट्रकचालक पळून गेल्याने गुटखा कोणी पाठविला व कोणाकडे जात होत हे गूढ गुलदस्त्यात आहे. मात्र जप्त केलेला आयशर ट्रकमालकाचा शोध लागल्यानंतर गुटखा विक्रीचे रॅकेट उघड होईल.

टॅग्स :PoliceपोलिसFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग