नाशिक : प्रेम प्रकरणावरून जुन्या भांडणाची कुरापत काढत तीघा हल्लेखोरांनी मिळून शनिवारी (दि.२७) संध्याकाळच्या सुमारास जेलरोडवरील दसक परिसरातील नदीकाठालगत सागर संदीप आहिरे (२०, रा. भगवा चौक, शिवाजीनगर ) या नावाच्या युवकाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे गतिमान करत अवघ्या तीन तासांतच दोघा संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचनकपणे उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सात आंबे परिसरात गोदावरीच्या काठालगत जेलरोड भागात सागरचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त विजय खरात यांच्यासह उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील रोहकले व सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मध्यवर्ती गुन्हे शाखा, गुन्हे शाखा युनीट-१ व २च्या पथकाच्या मदतीने रोहकले यांच्या तपासी पथकाने संशयावरून हल्लेखोर अजय दिपक जाधव (२१) व राहूल रहाटळ ( दोघे. रा. भगवा चौक, शिवाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी सागरच्या खूनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०२अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात सहभागी यांचा तीसरा साथीदार व मुख्य संशयित आरोपी राकेश घुमरे हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला असून तपासी पथके त्याच्या मागावर असल्याचे खरात यांनी सांगितले.
जेलरोड युवक खून प्रकरण : दोघा संशयित आरोपींना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 2:14 PM
संशयावरून हल्लेखोर अजय दिपक जाधव (२१) व राहूल रहाटळ ( दोघे. रा. भगवा चौक, शिवाजीनगर) यांना ताब्यात घेतले. त्या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी सागरच्या खूनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठळक मुद्देमुख्य संशयित आरोपी फरार युवकाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस