शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जिल्ह्यात ‘समृद्धी’साठी जमिनी खरेदीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:13 AM

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी शासनाने थेट खरेदीद्वारे जमिनी घेण्यास नाशिक जिल्ह्यात प्रारंभ केला आहे.

सिन्नर : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी शासनाने थेट खरेदीद्वारे जमिनी घेण्यास नाशिक जिल्ह्यात प्रारंभ केला आहे. सिन्नर तालुक्यातील १२ शेतकºयांच्या शेतजमिनी शासनाने येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी केल्या. या शेतकºयांच्या खात्यावर लगेचच आरटीजीएसद्वारे पैसे वर्ग करण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील ही पहिली जमीन खरेदी ठरली.समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यासाठी सिन्नर तालुक्याच्या बागायती क्षेत्र असणाºया पश्चिम भागात तीव्र विरोध करण्यात येत आहे. मात्र तालुक्यातील १२ शेतकºयांनी शासनाला या समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिल्या. शासनाच्या वतीने समृद्धी महामार्गासाठी नेमण्यात आलेले तहसीलदार कैलास कडलग यांनी जमीन खरेदी व्यवहार पूर्ण केला.महसूल आयुक्त महेश झडगे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी,रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष किरण कुरुंदकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, प्रांताधिकारी महेश पाटील, सिन्नरचे तहसीलदार नितीन गवळी यांच्या उपस्थितीत शेतकºयांच्या जमीन खरेदीस प्रारंभ करण्यात आला. समृध्दी महामार्गासाठी खरेदीद्वारे जमीन देणाºया वावी येथील बिजलाबाई कृष्णाजी लांडगे या वृध्देचा महसूल आयुक्त झगडे व जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लांडगे यांनी या महामार्गासाठी १६ गुंठे जमीन दिली असून मूल्यांकनानुसार सुमारे २८ लाख ७६ हजार रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर वर्ग झाल्याची माहिती प्रांताधिकारी महेश पाटील व तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली.येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दुपारी वावी येथील चार, सायाळे येथील तीन, धोंडवीरनगर येथील दोन तर दुशिंगपूर, सोनांबे, दातली अशा सहा गावातील १२ शेतकºयांनी शासनाला थेट खरेदीद्वारे जमिनी दिल्या. या शेतकºयांच्या बॅँक खात्यावर आरटीजीएसद्वारे पैसे वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार गवळी यांनी दिली.जिल्हा समितीने घोषित केलेल्या दराच्या पाच पट दर शेतकºयांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार नितीन गवळी यांनी दिली. त्याचबरोबर शेतकºयांना मालमत्ता मूल्यांकन करुन पैसे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यात विहिरी, घरे, फळझाठे, वृक्ष, पाईपलाईन यांचे मुल्यांकन करुन पैसे देण्यात आले. या मूल्यांकनाच्या अडीचपट रक्कम शेतकºयांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.शासनाने समृध्दी महामार्गासाठी खरेदी केलेल्या १२ शेतकºयांच्या ४ हंगामी बागायती तर ८ जिरायती खरेदी केल्या. हंगामी बागायती जमिनींना दीड पट भाव देण्यात आला.समृद्धी महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील १२ शेतकºयांची आज शनिवारी एकूण १३.४९ हेक्टर क्षेत्राची खरेदी करण्यात आली. त्याबदल्यात शेतकºयांच्या खात्यावर८ कोटी ४० लाख रुपये वर्ग करण्यात आले. तालुक्यासाठी लागणार ८०० कोटीसिन्नर तालुक्यातील २६ गावांमधून सुमारे ७९७ हेक्टर क्षेत्र समृद्धी महामार्गासाठी लागणार आहे. तालुक्यात या महामार्गाची लांबी सुमारे ६१ किलोमीटर आहे. सुमारे १४५१ शेतकºयांच्या मालकीचे अंदाजे १२६० गटांचा समावेश यात आहे. या दोन हेक्टर क्षेत्र शासकीय, १७.८१ हेक्टर क्षेत्र वनविभागाचे आहे. समृद्धी मार्गाची रुंदी १२० मीटर असणार आहे. तालुक्यातील सुमारो ७९७ हेक्टर खरेदीसाठी ७०० ते ८०० कोटी रुपये लागणार असल्याचा अंदाज तहसीलदार गवळी यांनी व्यक्त केला.