नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकाºयास शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा कैद्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकारी श्रेणी २ प्रदीपकुमार ज्ञानदेव बाबर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गेल्या २७ मे रोजी कैदी सागर ऊर्फ चन्या अशोक बेग हा परवानगी न घेता मंडल क्रमांक ७ मधील बॅरेक क्रमांक ३ मधील त्याच्या सहअपराध्यास भेटण्यासाठी गेला होता. यावेळी बाबर यांनी त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर बेग याला कारागृह अधीक्षक यांच्यासमोर राउंडमध्ये उभे करून जबाब नोंदविण्यात आले. याबाबत न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. कैदी जयप्रकाश ऊर्फ सोन्या अशोक बेग हा स्वत:चा बिछाना दुसºया बंद्याकडे देऊन त्याच्यासोबत खाली येत असताना बाबर यांनी सोन्या बेग याला तुझा बिछाना तू घेऊन जा असे सांगितले. त्याचा राग आल्याने बेग याने बाबर यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर कैदी सागर बेग, संघर्ष बाळासाहेब दिघे, गोरख ऊर्फ विजय मुन्ना जेधे, नीलेश बाळासाहेब परदेशी, जयप्रकाश ऊर्फ सोन्या अशोक बेग, अंकुश रमेश जेधे हे मंडल कार्यालयासमोर जमा होऊन त्यांनी बाबर यांना शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुरुंगाधिकाऱ्यास जिवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:58 AM
नाशिकरोड : शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकाºयास शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा कैद्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देनाशिकरोड : शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल