शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

जैन दीक्षार्थी रुचिता सुराणा यांची घोटीत शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 5:24 PM

शनिवारी सोहळा : विविध मान्यवरांची उपस्थिती

ठळक मुद्देरु चिता सुराणा हिने गृहस्थाश्रमाचा त्याग केला असून शनिवारी घोटी येथील जैन भवनाच्या प्रांगणात दीक्षा विधीस सुरवात होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : येथील अशोक सुराणा यांची एकुलती एक कन्या रु चिता सुराणा यांनी जैन समाजाचे दीक्षा व्रत अंगिकारत असून त्या पार्श्वभूमीवर शुक्र वारी(दि.१४) शहरातून शोभा यात्रा काढण्यात आली. शनिवारी (दि.१५) दीक्षा अंगिकार समारंभ होणार आहे.शुक्रवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन रु चिता सुराणा यांची त्यांच्या मातापित्यासोबत शोभायात्रा काढण्यात आली. रु चिता सुराणा हिने गृहस्थाश्रमाचा त्याग केला असून शनिवारी घोटी येथील जैन भवनाच्या प्रांगणात दीक्षा विधीस सुरवात होणार आहे. रु चिता सुराणा या पंकज मुनीजी म.सा. यांच्या सानिध्यात जैन दीक्षा ग्रहण करणार आहेत . त्यानिमित्त जैन स्थानकापासून भंडारदरा रोड मार्गे जैन भवन पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जैन भवन येथे शोभायात्रेची सांगता झाली. त्यानंतर गुरु महाराजांचे दीक्षा या विषयावर प्रवचन झाले. तसेच विविध मान्यवरांच्यावतीने रु चिता सुराणा यांच्यासह त्यांच्या मातापित्याचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्र म झाला.यावेळी जैन समाजाचे संघपती नंदकुमार सिंघवी, माजी संघपती किसनलाल पिचा, उमेद पिचा, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, संजय चोरडिया, विजय कर्नावट, नवसुखलाल पिचा, डॉ. चोरडिया, दिपक चोरडिया, प्रवीण पिचा, रवींद्र गोठी, अविनाश गोठी, ललित पिचा, सचिन लोढा, तुषार बोथरा, पंकज भंडारी, पारस चोरडिया आदी उपस्थित होते. ईश्वर चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Nashikनाशिक