येवला : समरथच्छाधिपती जैन समाजाचे आराध्य प.पू. १००८ उत्तमचंद म.सा. व प.पू. १००५ विमलकंवर म.सा. यांच्या सुशिष्या प.पू. विमलयशा म.सा., प.पू. सुप्रज्ञा म.सा., प.पू. सुरूची म.सा., प.पू. प्रज्ञाप्ती म.सा., प.पू. निकिता म.सा. यादि ठाणा पाच यांचे चतुर्मासनिमित्त येवला शहरात आगमन झाले असून, येथील जैन बांधवांनी उत्साहात व मंगलमय वातावरणात त्यांचे स्वागत केले.त्रिशला नंदन वीर की जय बोलो महावीर की, आज का दिन कैसा है सोने से भी मेहंगा है, अशा घोषणानी प.पू. साध्वीजींचे जैन बांधवांनी श्रीराम कॉलनीपासून विंचूररोड, शनि पटांगण, मेनरोडमार्गे कापड बाजारातील जैन स्थानकापर्यंत स्वागत यात्रा काढण्यात आली. या यात्रेत माणकचंद छाजेड, मोतीलाल सोनी, ओसवाल समाज अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ, राजकुमार राका, जवाहरलाल जैन, राजेश भंडारी, अजय जैन, रवींद्र बाफणा, जीवन चंडालिया, अरुण सोनी, मदन चंडालिया, पारस बाफणा, सुभाष समदडिया, जिनेन्द्र बंब, नेमिचंदजी श्रीश्रीमाळ, जितेश जैन, नेमिचंद काकरिया, हर्षल छाजेड, हर्षद पारख, प्रवीण श्रीश्रीमाळ, योगेश सोनी, बहु मंडल, कन्या मंडल, अरिहंत जैन ग्रुप, भारतीय जैन संघटना जैन बांधव महिला सहभागी होते.(वार्ताहर)
येवल्यात चतुर्मासानिमित्त जैन मुनींचे आगमन
By admin | Published: July 19, 2016 12:25 AM