नाशिक : जैन मुनी मैत्रीभूषण विजयजी म.सा. व जैन मुनी मुक्तीभूषण विजयजी म.सा. यांच्या चतुर्मास प्रवेशानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. नाशिक येथे जैन मुनी मैत्रीभूषण विजयजी म.सा. व जैन मुनी मुक्तीभूषण विजयजी म.सा. चतुर्मास प्रवेश सोहळा शनिवारी सकाळी उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शरणपूररोडवरील सुमती सोसायटीमधून मिरवणुकीला प्रारंभ झाला. तर टिळकवाडी येथील आराधना भवन येथे मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी शैलेश शहा, प्रकाश बोथरा, प्रवीणभाई शहा, गौतम सुराणा, भूपेंद्र शहा, अनुज शहा, वीरेंद्र शहा, सुभाष शहा, जितेंद्र शहा, राजू शहा, स्वरूपचंद भंडारी, सिल्केश कोठारी, पृथ्वीराज बोरा, निरंजन शहा, हेमंत बोथरा, अजित शहा, डॉ. शैलेंद्र शहा, महेश शहा, जयंतीलाल समदडिया, अभय कटारिया, अनिल नहार आदींसह जैन साधू, साध्वी, सकल जैन संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलफगर परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यावेळी जैन संघाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. याप्रसंगी जैन मुनींनी प्रवचनात सांगितले की, मनुष्याने आपल्या जीवनात धर्माचे अधिष्ठान ठेवल्यास भविष्य उज्ज्वल आहे. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. मानव जन्माचे सार्थक करण्यासाठी प्रयत्न करावा. यावेळी भक्तिगीत, स्वागतगीत व संघपूजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
जैन मुनी यांचा चतुर्मास प्रवेश सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:57 AM