मालेगाव : जैन सोशल ग्रुप संगिनी फोरमचे मालेगाव येथील अग्रसेन भवनात येत्या रविवारी (दि. ७) राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येत असल्याची माहिती संगिनी फोरमच्या अध्यक्ष पंकज वडेरा यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.वर्धमाननगरातील अग्रसेन भवनात सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान होणाºया अधिवेशनासाठी राज्यभरातील संगिनी फोरमच्या सदस्य महिला उपस्थित राहणार आहेत. राज्यात जैन संगिनीचे ७० ग्रुप असून, १० हजारांपेक्षा अधिक सभासद आहेत. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यभरातील १७०० पेक्षा अधिक सदस्य महिला या कॉन्फरन्समध्ये सहभागी होतील.प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण चोपडा, सतीश बाफना, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, विरेन शहा, शरद शहा आदी उपस्थित राहणार आहेत. यात प्रत्येक ग्रुपमध्ये ६० महिला असून, ११ ग्रुप सहभागी होतील. त्यात फलटण, गुलबर्गा, औरंगाबाद, कोल्हापूर, राहुरी, सातारा येथील संगिनी सदस्य असतील. दुपारी टॅलेण्ट शो होईल. राज्यभरातील जैन सोशल ग्रुप व संगिनी ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात येऊन विचारांचे आदान-प्रदान करून पुढील कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विचारमंथन होईल.मालेगावात गेल्या २० वर्षांपासून जैन सोशल ग्रुपचे काम सुरू असून, कोणताही निधी उपलब्ध नसताना फोरमच्या कार्यकर्त्या तनमनधनाने सामाजिक कार्य करीत आहेत. यावेळी स्मिता सांखला, कविता कासलीवाल यांनीही फोरमतर्फे राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पत्रकार परिषदेस प्रीती कुचेरिया, करिश्मा कासलीवाल, मीनल शहा, ममता कासलीवाल, रेखा हाढ, संगीता साखला आदी उपस्थित होत्या.
जैन सोशल ग्रुप संगिनीचे रविवारी राज्य अधिवेशन मालेगाव : पत्रकार परिषदेत पंकज वडेरा यांनी दिलेली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:39 AM
मालेगाव : जैन सोशल ग्रुप संगिनी फोरमचे मालेगाव येथील अग्रसेन भवनात येत्या रविवारी (दि. ७) राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येत असल्याची माहिती संगिनी फोरमच्या अध्यक्ष पंकज वडेरा यांनी दिली.
ठळक मुद्दे१७०० पेक्षा अधिक सदस्य सहभागी दुपारी टॅलेण्ट शो