नाशिक : कोकणामधील जैतापूरचा रखडलेला अणु ऊर्जा प्रकल्प येत्या तीन ते चार वर्षांत सुरू होण्याची शक्यता आहे, असे मत अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी काकोडकर सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकारांनी त्यांची भेट घेत संवाद साधला. यावेळी काकोडकर म्हणाले, चार दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने घेतलेल्या अणु चाचणीपासून भारताला कुठलाही धोका नाही. तसेच अणुऊर्जेच्या बाबतीत भारत सक्षम असून, पाकिस्तानपासून घाबरण्याचेही काही कारण नाही. अणुऊर्जेच्या बाबतीत पाकिस्तानकडून अणुशक्तीबाबत जे चित्र निर्माण केले जात आहे, ते सत्य असल्याचे गृहीत धरले तरी भारत पाकिस्तानला अणुशक्तीच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. कोकणातील रखडलेला अणुऊर्जा प्रकल्प येत्या काही वर्षांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
जैतापूर अणु प्रकल्प सुरू होण्याची शक्यता
By admin | Published: September 13, 2016 1:57 AM