इगतपुरी तालुक्यातील भावली धरण काही दिवसांपूर्वीच काठोकाठ भरल्याने जलपूजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संततधारेमुळे दारणा, मुकणे, कडवा या धरणांच्या जलसाठ्यातदेखील वाढ झाली आहे. यापैकी कडवा धरण ओसंडून वाहत आहे. दरम्यान, तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्वदूर हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील कडवा धरण काठोकाठ भरल्याने तालुक्यातील निनावीचे सरपंच गणेश टोचे, पिंपळगाव डुकराचे सरपंच भगवान वाकचौरे, पिंपळगाव घाडगाचे सरपंच देविदास देवगिरे, मायदरा धानोशीचे सरपंच साहेबराव बांबळे, बारशिंगवेचे सरपंच अशोक बोराडे, सोनोशीचे सरपंच दिलीप पोटकुले, धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे, वंजारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे तसेच कडवा धरणाचे शाखा अभियंता नितीन मुठाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत जलपूजन करण्यात आले.
फोटो- २२ कडवा डॅम
इगतपुरी तालुक्यातील कडवा धरण काठोकाठ भरल्यामुळे सरपंच गणेश टोचे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच भगवान वाकचौरे, देविदास देवगिरे, साहेबराव बांबळे, शाखा अभियंता नितीन मुठाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
220921\22nsk_21_22092021_13.jpg
फोटो- २२ कडवा डॅम